मुंबई : भात शिजवल्यानंतर अनेकजण त्यावरील पाणी फेकून देतात. तुम्हीही असे करता. कारण तुम्हाला त्याचे फायदे ठाऊक नाहीत. भाताचे पाणी आरोग्यासाठी अतिशय फायेदशीर आहे. त्यामुळे त्वचा, केसांचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तर भाताचे पाण्याचे नेमके फायदे काय आणि त्याचा वापर कसा करावा, जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# भाताच्या पाण्याचे चेहरा धुतल्यास त्वचा कोमल होते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग, स्पॉट्स दूर होण्यास मदत होते. भाताच्या पाण्यात प्रोटीन, व्हिटॉमिन आणि अॅंटी-ऑक्सीडेंट असतात. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास भाताचे पाणी उपयुक्त ठरते.


# तुम्ही राईस वॉटर मास्क देखील ट्राय करु शकता. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा घट्ट होण्यास मदत होईल. यासाठी एक ग्लास भाताच्या पाण्यात एक पेपर टॉवेल १० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर तो काढून चेहऱ्यावर १५-३० मिनिटे ठेवा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. हा उपाय तुम्ही दररोज करु शकता. ते शक्य नसल्यास आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास नक्कीच फायदा होईल. 


# भातात इनॉसिटॉल नावाचे कार्बोहायड्रेट असते. त्यामुळे केस मजबूत व चमकदार होतात. याचा वापर तुम्ही शॅम्पू किंवा कंडीशनर म्हणूनही करु शकता. यासाठी भाताचे पाणी केसांना लावून मसाज करा आणि थोड्या वेळाने साध्या पाण्याने केस धुवा. हा उपाय आठवड्यातून एकदा अवश्य करा.