Vaccine for Cancer & Heart Disease : रोग्य क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कॅन्सर आणि हृदयविकारावरही आता लस येणार आहे. 2030 पर्यंत ही लस उपलब्ध होणार असल्याचं समजते. कोविड लसीनंतर आता अमेरिकन शास्त्रज्ञ कॅन्सर, हृदयविकारावर लस तयार करण्यात गुंतले आहे. या लशीमुळे लाखो रुग्णांचा जीव बचावणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात दरवर्षी कॅन्सर आणि ह्रदयरोगामुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो. मात्र आता कॅन्सर आणि हृदयविकारावरही आता लस येणार आहे. कोविड लसीनंतर आता अमेरिकन शास्त्रज्ञ कॅन्सर, हृदयविकारावर लस तयार करण्यावर संशोधन करत आहेत. त्यासोबतच ऑटोइम्युन विकार आणि अन्य आजारांपासून बचाव होण्यासाठी लस घेऊ शकतील. 


जगासह भारतात कॅन्सर आणि हृदयविकारामुळे  मृत्युमुखी पडणा-यांची संख्या मोठी आहे. पाच वर्षात सर्व प्रकारच्या रोगांवर लसीद्वारे उपचार करता येऊ शकतील असा दावा मॉडर्नाचे कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बर्टन यांनी केला आहे. ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा ट्यूमर, कॅन्सर नष्ट होऊ शकणार आहे.  विशेष म्हणजे कोरोनावरही याच मॉडर्ना कंपनीने लस तयार केली होती. 


2022 मध्ये देशात 14,61,427 जणांना कॅन्सरचं निदान झालं होतं तर 28 हजार जणांचा ह्रदयविकारामुळे मृत्यू झाला होता. कॅन्सरवरचे उपचारही वेदनादायी आणि खर्चिक असतात. मात्र आता या दोन्ही जीवघेण्या आजारांवर लस तयार होतेय. 2030 पर्यंत दोन्ही लसी उपलब्ध होणार असल्याचं समजतंय. आरोग्य क्षेत्रासाठी हे एक वरदानच म्हणावं लागेल. कोविड लसीनंतर आता अमेरिकन शास्त्रज्ञ कॅन्सर, हृदयविकारावर लस तयार करण्यात गुंतले आहे. त्यासोबतच ऑटोइम्युन विकार आणि अन्य आजारांपासून बचाव होण्यासाठी लस घेऊ शकतील. 


केमोथेरपी आणि रेडीएशनची गरज नाही


महिलांमध्ये सर्वाधिक आढळणा-या ब्रेस्ट कॅन्सरनंतर आता सर्व्हिकल कॅन्सरचं म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय.  हा कँन्सर वाढलेल्या अवस्थेत असल्यास केमोथेरपी आणि रेडीएशन सोबतच केल्यास सर्जरीची आवश्यकता नसल्याचं टाटा कॅन्सर रूग्णालयानं समोर आणलं.


भारतात दरवर्षी 1 लाख 32 हजार महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आढळतो. यामुळं दरवर्षी 67 हजार महिलांचा मृत्यू होतो. 75 टक्के महिलांमध्ये कँन्सरचं निदान अँडव्हान्स स्टेजमध्ये गेल्यानंतरच झाल्याचं दिसून येत. अँडव्हान्स स्टेज म्हणजे 1B ते 3 B पर्यंतचा किंवा गाठीचा आकार 4 सेमीपेक्षा जास्त असतो. मात्र यासाठी सर्जरी करण्याची आवश्यकता नसल्याचं टाटा कँन्सर रूगालयानं समोर आणलंय. यासाठी केवळ केमोथेरपी आणि रेडिएशनसोबत करणं आवश्यक आहे.