Happy Kiss Day 2023 : प्रेमवीरांचा उत्साह शिगेला आहे. गेल्या मंगळवार 7 फेब्रुवारीपासून आपण व्हॅलेंटाइन वीक 2023 (Valentine week 2023) साजरा करत आहोत. उद्या या सोहळाचा खास दिवस...प्रेमीयुगुल Valentine Day मोठा उत्साहात साजरा करणार आहेत. या उत्सावातील (Valentine Day 2023) आजचा दिवस आहे kiss day आहे. जसं आपण मीठी (Hug day 2023)  मारण्याचे फायदे  समजून घेतले. तसंच चुंबन (benefits of kiss for health) घेण्याचेही आरोग्यास अनेक फायदे (Kiss Benefits) आहेत.  हे फायदे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. (Viral Kiss Video)


 रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते (Immunity strong)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुंबन घेतल्यामुळे सायटोमेगॅलो विषाणूविरूद्ध महिलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याशिवाय चुंबन घेताना आपण एकमेकांना बग्स आणि व्हायरस ट्रान्सफर करतो. ज्यामुळे आपल्या रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.


हॅप्पी हार्मोन्स तयार होतात (Happy hormones)


तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, चुंबन घेतल्यामुळे तुमच्या शरीरात हॅप्पी हार्मोन्स तयार होतात. जेव्हा तुम्ही किस करता तुम्हाला मेंदूतून ऑक्सीटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन हे हॅप्पी हार्मोन्स उत्तेजीत होतात. त्यामुळे तुमचा मूड चांगला आणि आनंदी राहतो. 


वजन घटतं (weight loss)


1 मिनिट चुंबन (Kiss Benefits) घेतल्याने आपल्या शरीरातील 26 कॅलरीज बर्न (Burn calories) होते, असं तज्ज्ञांचं मत आहे. 


हृदयसाठी फायदेशीर (Heart healthy)


चुंबन घेतल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि रक्तदाबवर नियंत्रण राहतं. 



चिंता आणि तणावमुक्त (Anxiety and stress free)


चुंबन घेतल्याने शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनची पातळी घटते. त्यामुळे तुम्ही तणावमुक्त होता, असं तज्ज्ञांचं मत आहे. 



चेहऱ्याच्या स्नायूंला व्यायाम (Good for facial muscles)


चुंबन घेतल्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंला व्यायाम होतो. त्यामुळे चेहऱ्याचे स्नायू घट्ट आणि टोन्ड होतात आणि तुम्ही सुंदर दिसता. शिवाय चुंबन घेतल्यामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढतं. याचा फायदा तुमचा रंग उजळण्यास होतो. 


दातांसाठी फायदेशीर


एका डॉक्टरने असा दावा केला आहे की, दररोज चार मिनिटं चुंबन घेतल्याने दातांना ब्रश (Brush) केल्यासारखं स्वच्छ होतात. स्मूच (smooch) केल्याने तोंडातील सलाइव्हा प्रोडक्शन वाढते आणि तोंडात दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश होतो. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)