मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या ‘भेडिया’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'भेडिया' (Bhediya) या चित्रपटात वरुण धवनसोबत अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्या या चित्रपटाच्या ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सध्या वरुण हा 'भेडिया'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, एका मुलाखतीत वरुणनं एक मोठा खुलासा केला आहे. वरुणनं नुकतंच सांगितलं की तो वेस्टिब्युलर हायपोफंक्शन (Vestibular Hypofunction) नावाच्या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे. सगळ्यांना प्रश्न पडला असेल की वेस्टिब्युलर हायपोफंक्शन म्हणजे काय? वेस्टिब्युलर हायपोफंक्शन लक्षणं कोणती आहेत? त्याच्यावर उपचार कसा करायला हवा? आणि वेस्टिब्युलर हायपोफंक्शन होऊ नये म्हणून नक्की काय करायला हवं. 


वेस्टिब्युलर हायपोफंक्शन म्हणजे काय? (What is Vestibular Hypofunction?)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्टिब्युलर हायपोफंक्शन ही एक अशी स्थिती आहे जी एखाद्या व्यक्तीच्या संतुलनावर परिणाम करते. कानाचा आतील भाग जो तुमच्या बॅलन्स सिस्टीमचा एक महत्त्वाचा भाग आहे तो नीट काम करत नाही तेव्हा असं होतं. या आजारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तीची वेस्टिब्युलर प्रणाली (Vestibular System) योग्यरित्या तुम्हाला प्रतिसाद देत नाही आणि मेंदूला चुकीचा मेसेज पाठवते. यामुळे, त्या रुग्णाला चक्कर येते. फोर्टिस रुग्णालयातील ईएनटी एक्सपर्ट डॉ. विदित त्रिपाठी यांच्या मते, "यामुळे ज्या अवयवांमुळे आपले संतुलन राहते त्यांच्यात असंतुलन निर्माण होते. जे एका व्हायरल इन्फेक्शमुळे होऊ शकते किंवा कधी काही वेगळी कारणेही असू शकतात. कधी हे थोड्याच काळासाठी असते किंवा कधी हे कायम स्वरूपी राहते. पण बहुतांश लोक हे थोड्या दिवसात किंवा आठवड्यांमध्ये बरे होऊ शकतात. हा गंभीर आजार नाही आणि योग्य औषधोपचार आणि व्यायाम केला तर तुम्ही लवकर बरे होऊ शकता. 


वेस्टिब्युलर हायपोफंक्शनची लक्षणे (Symptoms of Vestibular Hypofunction)


वेस्टिब्युलर हायपोफंक्शन लक्षणे म्हणजे चक्कर येणे, मळमळ आणि संतुलन न होणे यांचा समावेश आहे. काही लोकांना गर्दीच्या ठिकाणी चालतानाही त्रास होऊ शकतो. इतर लक्षणं ही रोगाच्या कारणावरही अवलंबून असतात. मळमळ, उलट्या, एका ठिकाणी उभ राहू न शकणे, अंधार असलेल्या ठिकाणी चालताना अडचणी येणं याशिवाय डोळ्यांची असामान्य हालचाल यांसारखी लक्षणं देखील पाहायला मिळतात. या लक्षणांविषयी शाल्बी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, मोहाली येथील वरिष्ठ ईएनटी आणि कॉक्लियर इम्प्लांट सर्जन डॉ. धीरज गुरविंदर सिंग यांनी सांगितले आहे. 


वेस्टिब्युलर हायपोफंक्शनसाठी उपचार (Treatment for Vestibular Hypofunction)


या आजारावर उपचार करण्यासाठी फिजिओथेरपीची महत्त्वाची भूमिका असते. नियमित व्यायाम केल्यास हळूहळू आपण यातून बाहेर येऊ शकतो. 


सावधगिरी बाळगण्यासाठी काय करू शकता- 


1. मद्यपान आणि धूम्रपान करू नये, या दोन्ही गोष्टींमुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. 


2. आपल्याला शरिराला गरजेचे सगळे न्युट्रिशियन्स, मिनरल्स, व्हिटामिन्स आणि संतुलित आहाराच असणे गरजेचे आहे. 


3. नियमितपणे व्यायाम करणे


4. नियमित तपासणीसाठी जा
(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)