मुंबई : आजकाल 'फिगर' मेन्टेनकरण्यासाठी डाएटचं खूळ दिवसेंदिवस वाढते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोक विशिष्ट पदार्थ, विशिष्ट तेलांचा आहारात समावेश करतात. 'वेगन' म्हणजे हेल्दी असा एक समज अनेकांच्या मनात आहे. पण वेगन पदार्थांमध्येही कॅलरीज असतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 


एनर्जी बार किंवा  ग्रॅनोला बारमध्येही साखर , रिफाईन्ड ऑईल, आर्टिफिशियल कलर यांचा समावेश असतो. त्यामुळे अवेळी लागणार्‍या भूकेवर मात करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या एनर्जी बार्सचा वापर करत असलात तरीही त्यामुळे नकळत कॅलरी वाढते. 


व्हेगन डेझर्ट्समध्ये अंड आणि बटर यांचा वापर टाळून  स्टार्च, गम्स यांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. परिणामी शरीरात कॅलरीज आणि सिंमल कार्बोहायाड्रेट्स वाढण्याचा धोका अधिक असतो. 


फ्रोझन व्हेगन मिल किंवा अन्न पदार्थांचा आहारात समावेश करणं आरोग्याला त्रासदायक असते. यामध्ये अन्न दीर्घ काळ टिकून रहावे याकरिता काही प्रिझर्व्हेटीव्ह्ज वापरली जातात. परिणामी त्याचा नकळत आरोग्यावर परिणाम होतो. 


कोकोनट योगर्ट - दूग्धजन्य पदार्थांऐवजी तुम्ही कोकोनट योगर्ट वापरत असाल तर ते आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. यामध्ये केवळ 1 ग्रॅम प्रोटीन आढळते तर सॅच्युरेटेड फॅट अधिक असते.


व्हेजी चिप्स - अनेकदा व्हेजी चिप्समधून तुम्ही केवळ बटाटा आणि कॉर्न फ्लॉअर खाता. प्रोसेस्ड चिप्समध्ये केवळ रिफाईन्ड ऑईल, पीठ, साखर, स्टार्च, मीठ असते.