Viagra च्या गोळीचं मृत्यूशी कनेक्शन? शरीरात जाऊन कसं काम करते ही गोळी?
व्हायग्रा ही एक गोळी आहे जी पुरुषांची सेक्स ड्राइव्ह वाढवते.
मुंबई : व्हायग्रा ही एक गोळी आहे जी पुरुषांची सेक्स ड्राइव्ह वाढवते. लैंगिक संबंधांदरम्यान जे पुरूष कमकुवत आहेत त्यांच्यात शक्ती भरण्याचं काम गी गोळी करते. या गोळ्या अशा पुरुषांसाठी वरदान आहेत, ज्यांना इरेक्शन म्हणजेच लैंगिक उत्तेजनामध्ये त्रास होतो, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
परंतु काहीवेळा व्हायग्राच्या डोसबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे त्याचे परिणाम धोकादायक देखील असतात. काही दिवसांपूर्वी एक अशीच घटना घडली होती. एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने जीव गेला. हा हृदयविकाराचा झटका व्हायग्राशी जोडला गेला आहे.
वास्तविक, तरुणाच्या खिशातून व्हायग्राची गोळी सापडली. हॉटेलमध्ये त्याचे प्रेयसीसोबत संबंध होते. ज्या वेळी त्यांचा मृत्यू झाला. अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर व्हायग्रा गोळीमुळे मृत्यू होतो का अशी एक चर्चा रंगली.
वियाग्रा सेक्स पॉवर वाढवण्याचे काम करते
व्हायग्रा पुरुषांमध्ये इरेक्शन वाढवण्याचं काम करतं. व्हायग्राच्या वापरामुळे लिंगात रक्त प्रवाह वाढतो. त्यामुळे उत्साह येतो. तज्ज्ञांच्या मते, ज्यांना व्हायग्राची गरज आहे त्यापैकी केवळ 20 ते 30 टक्के लोकांनाच लैंगिक उत्तेजनाशी संबंधित समस्या आहेत.
70 ते 80 टक्के लोकांची लैंगिक समस्या ही मानसिक असते. पण ते ओळखत नाहीत आणि आरोग्यासाठी चांगली नसलेली ही गोळी वापरतात. डॉक्टर 20-25 मिलीग्राम व्हायग्रा घेण्याची शिफारस करतात.
शरीरात गेल्यावर कसं काम करते ही गोळी?
व्हायग्राच्या वापरामुळे पुरुषांमधील इरेक्टाइल डिसफंक्शन पासून तात्पुरता आराम मिळतो.
पुरुषांच्या लिंगामध्ये तात्पुरते रक्त प्रवाह वाढतो. त्यामुळे लिंग उत्तेजित होऊन तो आपल्या जोडीदारासोबत लैंगिक सुखाचा आनंद घेऊ शकतो.
Viagra गोळी घेतल्यानंतर 20 ते 25 मिनिटांनी त्याचा परिणाम दिसून येतो. ते सुमारे 2 तास टिकते.
व्हायग्रा महिलांमध्ये काम करते की नाही याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याचा वापर करू नये.