डाएट न करताही Belly Fat कमी कारायचंय? `या` गोष्टी करतील तुमची मदत
सकाळी उठल्यावर तुम्ही ही कामं केल्यास वजन वाढण्यास आळा बसेल शिवाय तुम्ही निरोगी राहण्यासंही मदत होईल.
मुंबई : काही केल्या वजन कमी होत नाहीये? बेली फॅटने तुम्हीही हैराण आहात? जीमला जायचा आणि एक्सरसाईज करायचा कंटाळा आलाय का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे व्यायाम न करताही किंवा जीमला न जाताही तुम्ही वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या रूटीनमध्ये काही सोधे आणि सोपे बदल करावे लागणार आहेत.
सकाळी उठल्यावर तुम्ही ही कामं केल्यास वजन वाढण्यास आळा बसेल शिवाय तुम्ही निरोगी राहण्यासंही मदत होईल. जाणून घ्या ही कामं नेमकी कोणती.
सकाळी सकाळी पाणी प्या
सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्यावं. शक्य असल्यास गरम पाण्याचं सेवन करावं. यामुळे तुमची कॅलरी बर्न होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे चरबीही कमी होईल. शिवाय तुमचं शरीरही डिटॉक्स राहण्यास मदत होईल.
हाय प्रोटीन नाश्ता करा
सकाळचा नाश्ता करताना त्यामध्ये हाय प्रोटीन पदार्थांचा समावेश करा. जसं की, दूध आणि अंड. अनेक संशोधनातून असं समोर आलं आहे की, प्रोटीनयुक्त पदार्थांच्या सेवनाने दीर्घकाळ भूक लागत नाही. परिणामी तुम्ही अतिप्रमाणात न खाता वजनावर त्याचा परिणाम होतो.
वजन तपासत रहा
वजन कमी करायचं असेल तर तुम्ही सातत्याने तुमचं वजन तपासत राहिलं पाहिजे. जेणेकरून तुम्हाला वजनाची माहिती असेल आणि तुम्ही स्वतःला मोटीवेट कराल.