मुंबई : अनेकदा मधुमेहामुळे डोळे, किडनी आणि हृदयाला नुकसान पोहचल्यावरच हा आजार असल्याचे निष्पन्न होते. सुरुवातीला याचा पत्ताही आपल्याला लागत नाही. शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करणाऱ्या या आजाराचे लवकर निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन त्यावर उपचार करता येतात. शरीरात होणारे हे बदल मधुमेहाचा संकेत देतात. पाहुया काय आहेत याची लक्षणे...


वारंवार लघवी येणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा शरीरात ब्लड शुगरचे प्रमाण वाढते तेव्हा वारंवार लघवी येते. शरीरात जमा झालेली शुगर मुत्राद्वारे शरीराबाहेर टाकली जाते.


खूप तहान लागते


ब्लड शुगरने पीडित व्यक्तीला सारखी तहान लागते.


भूक वाढते


शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्याने सारखी भूक लागते. तुम्हालाही हे लक्षण दिसताच एकदा ब्लड शुगर तपासून पहा.


वजन कमी होणे


भूक वाढूनही वजन मात्र कमी होत असल्यास ब्लड शुगर जरुर तपासा.


थकवा येणे


दिवसभर आळसावलेले वाटणे, थोडेसे काम केल्याने थकवा जाणवणे किंवा रात्रभर झोपूनही झोप पूर्ण झाल्यासारखी न वाटणे. ही लक्षणे मधुमेहाचा इशारा देतात. तेव्हा याकडे दुर्लक्ष करु नका.


कोणत्याही कामात मन न लागणे किंवा एकाग्रता कमी होणे


ब्लड शुगर अधिक असलेल्या व्यक्तीचे मन कोणत्याही कामात लागत नाही. कोणत्याही कामात एकाग्र करणे त्यांना अवघड होते.


अंधूक दिसणे


मधुमेहाचा सर्वात अधिक प्रभाव डोळ्यांवर पडतो. त्यामुळे व्यक्तीला कमी दिसू लागते. ब्लड शुगरमुळे डोळ्यांच्या पडद्यांना नुकसान पोहचते.


जखम उशिरा ठीक होणे


भाजी कापताना बोट कापल्यास किंवा शेव्हींग करताना कट गेल्यास ते लवकर ठीक होत नाही? मग हे ब्लड शुगर वाढल्याचे लक्षण आहे.


त्वचेची समस्या


रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने त्वचेच्या समस्या तोंड वर काढू लागतात. चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्स खूप जलद गतीने वाढू लागतात.