तुम्हीही त्रासला आहात स्किन प्रॉब्लेम्समुळे? या पाण्याने रोज चेहरा स्वच्छ करा होईल फायदाच फायदा
स्किन संदर्भात प्रॉब्लेम्समुळे हैराण झाला असाल तर कडुनिंबाचा वापर एकदा नक्की करून पहा.
SKIN CARE TIPS: आजकाल बरेच जण त्वचेसंदर्भात समस्यांनी त्रस्त असतात स्किन प्रॉब्लेमपासून मुक्तता व्हावी यासाठी आपण बरेच विविध प्रयत्न करत असतो. पार्लरच्या पायऱ्या झिजवतो.बऱ्याचदा पार्लरच्या ट्रीटमेंट्स खूप महागड्या असतात. पण बऱ्याचदा आपण काही स्वस्त आणि घरगुती ट्रीटमेंट्स करून या प्रोब्लेमपासून सुटका मिळवू शकतो आणि सुंदर तजेलदार त्वचा मिळवू शकतो
चला तर मग एक नजर टाकुयात अशाच काही उपायांवर
कडुनिंब हे त्वचेसंदर्भात येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेम्सठी खूप फायदेशीर आहे. कडुनिंबाचा वापर करून आपण स्किन प्रॉब्लेम्सना गुडबाय करू शकतो .कडुनिंबाचा वापर अनेक सौन्दर्यप्रसाधनांमध्ये देखील केला जातो.आयुर्वेदात कडुनिंबाला खूप महत्व दिल आहे .
स्किन ऍलर्जीवर गुणकारी
कडुनिंबामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेवर असलेले वाईट किटाणू मारण्यास कडुनिंब खूप फायदेशीर आहे
जर आपण रोजच्या रोज कडुनिंबाच्या पाण्याने तोंड धुतलं तर स्किन एलर्जी ,खाज उठणं, चेहऱ्यावरील डाग या सर्व समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल
पिंपल्सवर बहूउपयोगी
जर तुम्ही पिंपल्समुळे हैराण असाल तर रोजच्या रोज कडुनिंबाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा यामुळे चेहऱ्यावर काही घाण असेल तर ती स्वच्छ होण्यास मदत होईल आणि परिणामी पिंपल्स येणार नाहीत याच्याशिवाय पिम्पल्सना आलेली सूज किंवा खाज देखील यामुळे बारी होईल त्यामुळे जर तुम्हाला पिम्पल्सचा त्रास असेल तर कडुनिंबाचा वापर नक्की करा
ऑईली आणि ड्राय स्किनसाठी फायदेशीर
जर तुम्ही ऑईली आणि ड्राय स्किनच्या समस्येशी झगडत आहेत तर कडुनिंब तुमच्यासाठी वरदान आहे कारण कडुनिंबातले एंटीऑक्सीडींट आणि एंटीसेप्टिक गुण बॅक्टरीयांना मारण्यास मदत करते जे आपल्या स्किनसाठी खूप हानिकारक असतात स्किनमधील एक्सट्रा ऑइल हटवण्यासदेखील हे खूप मदतशीर आहे ज्यामुळे स्किन छान सॉफ्ट होते
कडूनिंबाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ केल्यास चेहऱ्याची चमक वाढते रंग साफ होण्यास मदत होतो एकूणच नितळ त्वचा मिळू शकते..जर तुम्ही खूप उन्हात फिरून आला आहात आणि त्यामुळे तुमची स्किन टॅन झालीये तर कडुनिंबाच्या पाण्याने साफ केल्यावर तुम्हाला हळू हळू फरक जाणवू लागेल..
जर तुम्ही कोणत्याही स्किन संदर्भात प्रॉब्लेम्समुळे हैराण झाला असाल तर कडुनिंबाचा वापर एकदा नक्की करून पहा..यामुळे पार्लरमध्ये जाणारे पैसे हि वाचतील आणि घरच्या घरी कुठलेही केमिकल्स न वापरता तुम्ही सुंदर आणि नितळ त्वचा मिळवू शकता .