फळं शरीरासाठी चांगली असली तरी, कलिंगड केव्हा ही खाणं तुमच्यासाठी नुकसानकारक
कलिंगड हे आरोग्यदायी आणि चविष्ट फळ आहे यात शंका नाही. परंतु कलिंडच्या फायद्यासोबतच त्याचे तोटे देखील आहेत.
मुंबई : असं म्हणतात की, फळं ही आपल्या शरीरासाठी चांगले असतात. त्यामुळे डॉक्टर देखील आपल्याला ते खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे लोक वेगवगळी फळं खातात. त्यात कलिंगड हा देखील अनेक लोकांच्या आवडीचा फळ आहे, जो खूपच रसाळ आणि चवदार आहे. ज्यामुळे बहुतांश लोक हे फळ खातात. परंतु तुम्हाला माहितीय का की कोणत्या ही वेळेत कलिंगड खाणं चांगलं नाही.
कलिंगड हे आरोग्यदायी आणि चविष्ट फळ आहे यात शंका नाही. परंतु कलिंडच्या फायद्यासोबतच त्याचे तोटे देखील आहेत. ज्यामुळे काही तज्ज्ञ रात्रीच्या वेळीही कलिंगड न खाण्याचा सल्ला देतात.
कलिंगडमुळे कोणकोणत्या समस्या उद्भवतात, हे जाणून घेऊ या.
त्वचेशी संबंधीत समस्या
एका अभ्यासानुसार, जास्त प्रमाणात कलिंगड खाल्ल्याने त्वचेच्या पिवळ्या-केशरी विकृतीशी संबंधित असू शकते, ज्याला लाइकोपेनिमिया म्हणतात, जो कॅरोटेनेमियाचा एक प्रकार आहे. लाइकोपीन हे अँटिऑक्सिडंट आणि रंगद्रव्य दोन्ही आहे, जे कलिंगडसह अनेक फळे आणि भाज्यांना लाल रंग देते. लाइकोपीनच्या अतिसेवनामुळे त्वचेच्या रंगद्रव्यात बदल होऊ शकतो.
पचन समस्या
जास्त कलिंगड खाल्ल्याने गॅस, डायरिया किंवा पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. खरं तर, पोषणतज्ञ कलिंगडला फ्रक्टोज सामग्रीमुळे उच्च FODMAP अन्न मानतात. फ्रक्टोज हे मोनोसेकराइड किंवा साधी साखर आहे, ज्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोट फुगण्याची समस्या उद्भवते. म्हणूनच डॉक्टर रात्री कधीही कलिंगड खाऊ नये असे सांगतात.
वजन वाढणे किंवा लठ्ठपणा
कलिंगड खायला खूप चविष्ट आहे, पण त्यात भरपूर नैसर्गिक साखर असते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, साखरेचे प्रमाण जास्त झाल्याने वजन वाढू शकते. मात्र, ही समस्या तेव्हाच उद्भवते, जेव्हा रात्री पचनक्रिया मंद असते. दिवसा त्याचे सेवन केल्याने कोणतीही मोठी हानी होत नाही.
रक्तातील साखरेची पातळी
कलिंगड हे उच्च ग्लायसेमिक इंडेक्स (GI) अन्न आहे. याच्या अनियमित सेवनाने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. जर तुम्हाला मधुमेह असेल, तर ते अत्यंत सावधगिरीने सेवन केले पाहिजे. त्यात आढळणारे नैसर्गिक साखरेचे प्रमाण मधुमेहींना त्रासदायक ठरू शकतात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)