भांंड्यांंना येणारा मच्छीचा वास दूर करतील स्वयंपाकघरातील हे `5` पदार्थ
आठवड्यातून किमान एक दिवस मांसाहार्यांना घरात मच्छी, मटण खाण्याचा मोह होतोच. चिकन मटणपेक्षा मच्छी हा स्वादाला उत्कृष्ट असली तरीही मच्छीला उग्र वास असतो.म्हणूनच ती स्वच्छ करणं आणि नीट शिजवणं हे किचकट काम असतं
मुंबई : आठवड्यातून किमान एक दिवस मांसाहार्यांना घरात मच्छी, मटण खाण्याचा मोह होतोच. चिकन मटणपेक्षा मच्छी हा स्वादाला उत्कृष्ट असली तरीही मच्छीला उग्र वास असतो.म्हणूनच ती स्वच्छ करणं आणि नीट शिजवणं हे किचकट काम असतं
मच्छी वेगवेगळ्या स्वरूपात बनवली जात असल्याने भांड्यांना त्याचा वास तसाच राहतो. अनेक घरात शाकाहार आणि मांसाहार या दोन्हीसाठी वेगवेगळी भांडी नसतात. त्यामुळे मांसाहारानंतर ती भांडी नीट स्वच्छ न केल्यास दुसर्या पदार्थांना त्यांचा वास राहतो.
मग तुमच्या या समस्येवर उपाय म्हणून घरातीलच काही खास पदार्थ आणि घटक मदत करणार आहेत. मग हा सल्ला नक्की जाणून घ्या ...
लिंबू -
लिंबाला नैसर्गिक रूपातच एक मंद सुगंध असतो. त्यामुळे भांड्यांना असलेला वास दूर करण्याची त्याची मदत होते.
कसा कराल उपाय?
लिंबाच्या साली भांडी स्वच्छ करा. साल घासल्यानंतर भांडं थोडा वेळ तसेच राहू द्या. लिंबाच्या रसानेही तुम्ही भांडी स्वच्छ करू शकता. यामुळे त्याच्यावरील मच्छीचा उग्र दर्प कमी होण्यास मदत होते.
व्हिनेगर
व्हिनेगरच्या वापरामुळे ज्याप्रमाणे डाग दूर होतात तसेच भांड्यावरील उग्र वास हटवण्यासही व्हिनेगर मदत करते. नेहमीप्रमाणे भांडी स्वच्छ केल्यानंतर पुन्हा चमचाभर अॅपल सायडर व्हिनेगरच्या मिश्रणाने भांडी स्वच्छ करा.
संत्र्याची साल
लिंबाप्रमाणे संत्र्याची सालही फायदेशीर ठरते. मच्छीचं जेवण बनवून झाल्यानंतर त्याच भांड्यात लिंबू किंवा संत्र्याची साल उकळा. तीस मिनिटांनंतर लिक्विड सोपने भांडं स्वच्छ केल्यानंतर मच्छीचा वासही दूर होईल.
सफरचंद
मच्छीची भांडी स्वच्छ करण्यासाठी सफरचंदाचाही वापर प्रभावशाली ठरतो. मच्छी शिजवण्यापूर्वी त्या भांड्याला सफरचंदाची एक फोड घेऊन घासा. यामुळे त्यामध्ये मच्छीचा वास राहणार नाही.
डिश वॉशर
मच्छीचा वास दूर करण्यासाठी भांड्यावर गरम पाणी घाला. त्यानंतर लिक्विड सोपने भांडी स्वच्छ धुवावीत. प्रामुख्याने लिंबाचा समावेश असलेला लिक्विड सोप निवडा.