जांभईचं प्रमाण आटोक्यात ठेवतील या `5` टीप्स
जांभई केवळ कंटाळा आलाच की येते असे तुम्हांला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे.
मुंबई : जांभई केवळ कंटाळा आलाच की येते असे तुम्हांला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे.
कारण शरीरात ऑक्सिजन कमी असेल तर मेंदूला तशा सूचना दिल्या जातात आणि आपोआप जांभई येते. मग चारचौघांमध्ये किंवा महत्त्वाच्या मिटींगमध्ये तुम्ही असाल आणि सतत जांभई येत असेल तर त्यावर कशी मात कराल हे जाणून घेण्यासाठी या खास टीप्स
दीर्घ श्वास घ्या : शरीरात ऑक्सिजन कमी असेल तर जांभई येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुम्हांला सतत जांभया येत असतील तर दीर्घ श्वास घ्या. नाकातून श्वास आत घ्या आणि तोंडाद्वारा श्वास बाहेर टाका. यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ अप्लाईड अॅन्ड बेसिक मेडीकल रिसर्चच्या अहवालानुसार, सतत जांभई येत असल्यास विनोदी व्हिडिओ पहा. कारण हसणं हे जांभईचे प्रमाण कमी करण्याचा प्रभावी उपाय आहे.
आईस टी किंवा आईस कॉफी : आईस टी किंवा आईस कॉफी देखील जांभईचे प्रमाण कमी करते. शरीराचे तापमान कमी झाल्यास जांभई कमी येते असा एका संशोधनाचा अहवाल आहे. त्यामुळे थंडगार पेय प्या आणि चारचौघात सतत जांभई देण्याची सवय आटोक्यात ठेवा.
एसी मध्ये बसा : तुमच्या आजुबाजूचे वातावरण एसीच्या मदतीने थोडे थंड करा. म्हणजे महत्त्वाच्या मिटींग्समध्ये जांभई येणार नाही. असेदेखील काही संशोधनातून समोर आले आहे.
कोल्ड प्रेस : १-२ मिनिटांसाठी डोक्यावर कोल्ड प्रेस ठेवा. यामुळे काही काळ शरीरात थंडावा राहण्यास मदत होईल.