Child Weaknesses Health News: नवरा बायको दोघंही नोकरी करत असतील तर अनेकदा ते त्यांच्या मुलांना फारसा वेळ देत येत नाही. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर (Health News) लक्ष देता येत नाही. तुमच्या मुलांमध्ये खाली दिलेली लक्षणं (Weak Child Symptoms) दिसतात का? याकडे आत्ताच लक्ष द्या.


दिवसभर थकवा (Tired all day)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुमच्या मुलाचे शरीर निस्तेज राहत असेल आणि त्याला किंवा तिला दिवसभर थकवा जाणवत असेल तर ही बालकांच्या अस्वस्थ आरोग्याची लक्षणे आहेत. अशी परिस्थिती उद्भवल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवावं. 


सतत ताप येणे (Constant fever)


लहान मुलांना ताप आल्यावर पालकांच्या मनाला घोर लागून जाते. दर आठवड्याला किंवा दर काही दिवसांनी ताप येत असेल तर तुमच्या मुलांना लवकर दवाखान्यात दाखवा. 


चेहरापट्टीत बदल ( Face changes)


ओठ फुगणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, अंगावर पुरळ येणे, गिळताना त्रास होणे अशी लक्षणं दिसत असतील तर हे मुलांमध्ये अशक्तपणाचे सामान्य लक्षण असू शकतं. वेळीच काळजी घ्यावी लागेल.


धावताना धाप लागणे (Breath while running)


कोणतेही मूल धावत असेल किंवा चालत असेल तर अशा स्थितीत हृदयाची गती वाढणं सामान्य गोष्ट आहे. मात्र, थोडं जरी धावलं आणि धाप लागत असेल तर डॉक्टरांना सल्ला घ्यावा लागेल.


आणखी वाचा- Smiling Depression म्हणजे काय रे भाऊ? कसं ओळखायचं आणि लक्षणं काय?


सतत पाय दुखणे (Persistent leg pain)


खुप चालल्यावर, धावताना, उडी मारताना किंवा सर्वसाधारणपणे चालताना त्यांना वेदना होऊ लागतात. त्यामुळे मुलं पाय दुखत असल्याची तक्रार करतात. मात्र, ही तक्रार सतत येत असेल. तर प्रकरण गंभीर असू शकतं. त्यामुळे वेळीच उपचार घ्यावा.