बदलत्या ऋतूत तुम्हाला थकवा, अशक्तपणा जाणव आहे का?, या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या...
Weak Immunity Symptoms : बदत्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. बऱ्याचवेळा सकाळी उठल्यावर आपल्यात उत्साह नसतो. मरगळलेलापणा येतो. थकवा जाणवत असतो. काहीही करावेसे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही तात्काळ सावध होण्याची गरज आहे. आपली प्रतिकारशक्ती कमरजोर होत आहे, ही याची लक्षणे आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे.
How To Boost Immunity In Changing Season : निसर्गाचा लहरी स्वभाव आपल्यासाठी त्रासदायक ठरतो. त्यामुळे बदत्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. बऱ्याचवेळा उत्साह नसतो. मरगळलेलापणा येतो. थकवा जाणवतो. अशावेळी तुम्ही तुमची काळजी घेतली नाही तर आजारी पडू शकता. जेव्हा आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होऊ लागते, तेव्हा शरीर आपल्याला 5 प्रकारचे सिग्नल देते आणि सतर्क करु लागते. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य पावले उचलली नाहीत तर आजारी पडण्यास जास्त वेळ लागत नाही.
निसर्गात लाखो प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत, जे अन्न-पाणी किंवा हवेद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे होत काय की, ते आपल्याला आजारी पाडण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Symptoms) सहजपणे त्यांचा उद्देशात यशस्वी होऊ देत नाही. ही रोगप्रतिकारक शक्ती त्यासाठी लढा देत असते. मात्र, ज्यावेळी तुमची ही प्रतिकार शक्ती कमजोर होते, त्यावेळी तुम्ही आजारी पडलात म्हणून समजा.
डब्ल्यूबीसी, लिम्फ नोड्स, स्प्लीन, टॉन्सिल्स, अस्थिमज्जा, पेशी, ऊती आणि शरीरात बनलेल्या काही रसायनांपासून विकसित होतात. जेव्हा जेव्हा एखादा जीवाणू किंवा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यावर हल्ला करुन त्यांना नष्ट करुन टाकतात.
Immunity कमजोर दाखवणारी ही लक्षणे
काही कारणाने आपली ही रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ लागली, तर खोकला-सर्दी, ताप, डोकेदुखी, शरीरातील कमजोरी, उलट्या-जुलाब यांसारखे आजार आपल्याला जडू लागतात. जेव्हा असे घडते तेव्हा आपल्याला आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी बदलण्याची गरज असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करावी लागेल. जेव्हा जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते तेव्हा ती आपल्याला अनेक मार्गांनी सिग्नल देऊ लागते. ही लक्षणे कोणती आहेत ते जाणून घ्या.
इम्यूनिटी कमी झाल्याचे हे संकेत
1. पोटदुखी
जर तुमचे पोट सतत खराब होत असेल किंवा पचनशक्ती बिघडली असेल तर ते तुमची रोगप्रतिकार शक्ती कमजोर झाल्याचे लक्षण आहे. यानंतर तुम्ही सतर्क झाले पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
2. सतत ताणतणाव जाणवणे
जर तुम्हाला वेळोवेळी तणाव वाटत असेल किंवा थोडीशी प्रतिकूल गोष्ट ऐकूनही घाबरत असाल तर ते तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत निष्काळजीपणा करु नका.
3. वारंवार सर्दी-सर्दी
वारंवार सर्दी-सर्दी, खोकला किंवा ताप येणे हे देखील कमकुवत प्रतिकारशक्तीचे लक्षण आहे. यासोबतच कान दुखणे किंवा कानातून स्त्राव होणे हे देखील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याचे लक्षण आहे.
4. जखमा लवकर बऱ्या न होणे
जर तुमचे मुरुम आणि फोड लवकर बरे होत नसतील किंवा ते बरे होण्यास बराच वेळ लागत असेल, तर तुमची प्रतिकारशक्ती कमजोर होत असल्याचे हे लक्षण आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)