नवी दिल्ली :  वजनासह पोटाची चरबी कमी करणे कठीण गोष्ट असते. बेली फॅट कमी झाले तरी ते मेंटेंन करणे वेगळेच आव्हान असते. परंतु आयुर्वेदिक पद्धतीने पोटावरील चरबी कमी केल्यास दीर्घ काळासाठी लाभदायक ठरते. त्यामुळे काही आयुर्वेदिक पद्धती समजून घेऊ या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्रीचे जेवण कमी करा
दिवसभर आपली पचनप्रक्रिया चांगली असते. त्यासाठी दिवसभरातील जेवणाच्या 50 टक्के जेवण दिवसा घेण्याचा प्रयत्न करा. रात्री किंवा सायंकाळी 7 वाजेनंतर कमी जेवण करावे. 


रिफाइंड कार्ब्स :
जर तुम्ही बेली फॅट कमी करू इच्छिता तर रिफाइंड कार्ब्सपासून दूर रहा. रिफाइंड कार्बोहायड्रेटचे सेवन कमी केल्याने पोटावरील चरबी आपोआप कमी होईल. त्याशिवाय, स्विट ड्रिंक, पास्ता, ब्रेड, बिस्किट आणि तेलगट पदार्थ्यांचे सेवन टाळावे.


मेथीच्या बिया
आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठून मेथीच्या बियांचे उपाशी पोटी पाणी प्यावे. मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी पाणी गाळून प्या. असे काही आठवडे केल्याने पोटावरील चरबी कमी व्हायला सुरूवात होईल.


त्रिफळाचे सेवन
तज्त्रांच्या मते वजन कमी करण्यासाठी आपल्या डाइटमध्ये त्रिफळाचा सामावेश करावा. त्रिफळामुळे आपल्या शरीरातील विषारी पदर्थांना फेकण्यास मदत होते. तसचे पचनशक्तीही दुरूस्त होईल. वजन कमी करण्यासाठी जेवणानंतर गरम पाण्यात त्रिफळा चूर्णचे सेवन केल्याने फायदा होतो.


चालण्यात गती ठेवा
पोटाला 30 मिनिटांपर्यंत पकडून गतीने चालण्याचा सराव करा. गतीने चालल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. तुम्हाला शक्य झाल्यास वेगवेगळ्या पद्धतीचा योगाभ्यासही करू शकता.


गरम पाण्यासह अद्रक
अद्रकच्या पावडरमध्ये थर्मोजेनिक एजेंट असतात. जे शरीराच्या आतील फॅट बर्न करण्याचे कमा करतात. गरम पाण्यासह अद्रकच्या पावडरचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म व्यवस्थित राहते. शरीरात असलेले अतिरिक्त फॅट कमी होतात. 


चिंच 
चिंच मेटाबॉलिज्म आणि पचनक्रिया सुरळीत ठेवायला मदत करते. आयुर्वेदाच्या मते  चिंच झपाट्याने वजन कमी करण्यास मदत करते.


घास योग्य चावून खा
जेवण करताना, घास गिळण्याआधी नीट चावून घ्या. शरीरात कार्बोहायड्रेटचे पचन आपल्या तोंडातील लाळेसोबतच सुरू होते.