Healthy Rotis for Weight Loss : आजच्या काळात इथे प्रत्येक जण आपल्या आरोग्यासाठी जागृत झाले आहेत. आपण कायम फिट दिसावं आणि आपलं वजन नियंत्रणात राहावं असं प्रत्येकाची इच्छा असते. पण  खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जीवनशैली आणि शारीरिक हालचालींचा अभावामुळे वजन वाढीची समस्येने असंख्य लोक त्रस्त आहेत. वाढत्या वजनावर नियंत्रण न ठेवल्यास गंभीर आजाराचा सामना करावा लागतो, असं आहारतज्ज्ञ सांगतात. (Weight Loss Diet These 3 types of chapattis will cause weight gain to break quickly It will help to melt belly fat)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला वजन नियंत्रित करण्याचा सर्वात सोपा मार्ग सांगणार आहोत. पण त्यासोबतच तुम्हाला जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावं लागणार आहे. तसंच शारीरिक हालचालीसाठी वर्कआउट्स करणे गरजेचे आहे. वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात 'या' 3 प्रकारच्या चपात्याचा समावेश करा. 


'या' 3 पिठाच्या चपात्याने होईल वजन कमी!


नाचणीची भाकरी


नाचणीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. अशा स्थितीत त्याच्या सेवनाने वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. नाचणी हे ग्लुटेन-मुक्त धान्य असून त्यात साखरेचं प्रमाण खूप कमी असतं. याशिवाय यामध्ये भरपूर फायबर असल्याने पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात नाचणीच्या 2 चपात्या किंवा भाकरी खाल्ल्यास जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे जास्तीचे खाणे टाळलं जातं. 


बाजरीची भाकरी


वाढते वजन कमी करण्यासाठी बाजरी खूप प्रभावी मानली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या वजन कमी करण्यासाठी बाजरीच्या भाकऱ्या खाऊ शकता. यामध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात, जे तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतं. याशिवाय यामध्ये असलेले फायबर पचनसंस्था सुधारते आणि त्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही. 


ज्वारीची भाकरी


नाचणी आणि बाजरीप्रमाणेच ज्वारीही वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत करते. ज्वारीमध्ये इतर धान्यांपेक्षा जास्त फायबरदेखील असतं, जे वजन कमी करण्यास मदत करतं. याशिवाय ज्वारीचे सेवन केल्याने चयापचय गती कमी होते, जे वजन कमी करण्यासाठी खूप महत्वाचे ठरतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही या चपातीच आहारात समावेश नक्की करा. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)