Weight loss: वजन कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी करा फक्त `हे` काम; पटकन कमी होईल चरबी
अर्ध्याहून अधिक आजारपण हे फक्त झोपेनंच कमी होतं.
मुंबई : सध्याच्या जीवनशैलीमध्ये वाढतं वजन ही आताच्या पिढीसमोरची सर्वात मोठी समस्या आहे. असंख्य प्रयत्न करुनही वजन काही कमी होत नाही, हीच तक्रार बहुतांश लोकांकडून ऐकिवात येते. पण, वजन कमी करण्यासाठी तुम्ही कधी सोप्यात सोपे मार्ग अवलंबून पाहिले आहेत का? (Weight loss do these things before slip )
रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचं वाढलेलं वजन अगदी सहजपणे कमी होऊ शकतं. कधी विचार केलाय का याचा?
एक तास जास्त झोपा
रात्रीची झोप ही तासाभराने वाढवल्यासही तुमचं वजन कमी होणार आहे. सर्वजण जाणतात की अर्ध्याहून अधिक आजारपण हे फक्त झोपेनंच कमी होतं. पूर्ण आणि आवश्यक त्या वेळेतील झोप तुमच्या आरोग्याचं गुपित असतं. झोपेमुळं मानसिक शांतता मिळते, मानसिक शांतता मिळाल्यामुळे मूड स्वींग्स कमी होतात आणि अपेक्षेहून जास्त आहाराचं सेवनही यामुळं थांबतं.
झोपण्यापूर्वी प्या प्रोटीन शेक
झोपण्याआधी तुम्ही प्रोटीन शेक प्यायल्यास याचा फायदाच होणार आहे. असं म्हणतात की प्रोटीन्स कार्बोदके आणि फॅट्सच्या तुलनेत जास्त थर्मोजेनिक असतात. हे पचण्यासाठी अधिकाधीक कॅलरीत वारता येता आणि नष्टही होतात.
स्लीप मास्कचा वापर
स्लीप मास्कचा वापर करण्याचा थेट झोपेशीही संबंध आहे. जी माणसं जास्त उजेडात झोपतात त्यांचं वजन वाढण्याची शक्यता 21 टक्के इतकी असते. त्यामुळं झोपताना कायम स्लीप मास्क वापरा.
(वरील माहिती म्हणजे वजन कमी करण्याचा सुयोग्य पर्याय नाही, फक्त काही सल्ले आहेत. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )