10 दिवसात 7 किलो घटवण्यासाठी नियमित सकाळी प्या `हे` खास ड्रिंक !
आजकाल लठ्ठपणाची समस्या अगदी लहानमुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्रास आढळत आहे.
मुंबई : आजकाल लठ्ठपणाची समस्या अगदी लहानमुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्रास आढळत आहे. डाएट, योगा, व्यायाम यांच्या मदतीने वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सातत्य गरजेचे असते. सोबतच लठ्ठपणामागील नेमके कारण काय? याची वेळीच माहिती मिळाल्यास वजन घटवणं अधिक सुकर होते. डाएट, व्यायामाशिवायही वजन घटवायचे असेल तर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
काय आहे एक्सपर्ट सल्ला
आहारतज्ञ कविता गर्ग यांच्या सल्ल्यानुसार लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुमच्या डाएटवर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे. केवळ जीभेचे चोचले पुरवण्याकरिता नव्हे तर आरोग्याच्यादृष्टीने पोषक आणि संतुलित आहाराचा समावेश करणं गरजेचे आहे. शरीरात चरबी कमी करणं हे अत्यंत कठीण काम आहे.
चरबी कमी करणार खास ड्रिंक
1 कप पाणी
चमचाभर जीरं
अर्धा लिंबू
चमचाभर मध
कसं बनवाल ड्रिंक ?
पाणी उकळा. त्यामध्ये जिरं टाकून अजून दहा मिनिटं उकळत ठेवा. यामुळे पाण्यात जिरं अधिक चांगल्याप्रकारे शिजेल. यामुळे जिर्यातील तत्त्व पाण्यात उतरायला मदत होईल. हे पाणी ग्लासामध्ये मध आणि लिंबाचा रसात मिसळा. गरम चहा किंवा काढ्याप्रमाणे तुम्ही हा काढा किंवा हेल्दी ड्रिंक पिऊ शकता. नियमित रिकाम्या पोटी या काढ्याचे सेवन करणं फायदेशीर आहे.
खास टीप
पाण्यामधून जिरं काढून टाकू नका. जिरंदेखील चावून खावे. तुम्हांला थेट जिरं खाणं पसंत नसल्यास जिर्याची पावडर मिसळू शकता. या काढ्याचे सेवन केल्यानंतर 2 तास काहीही खाऊ नका. दिवसातून एकवेळेस रिकाम्या पोटी या काढ्याचे सेवन करा.