Best Drink For Weight Loss: आपल्या पोटाची ढेरी वाढत असते. त्यामुळे अनेकांना वजन वाढीचे टेन्शन नेहमी सतावत असते. अनेकांचे शरीर कसेही वाढलेले दिसते. ढेरी वाढल्याने विचित्र वाटते. याला कारण म्हणजे बर्‍याचदा खाण्यापिण्याच्या अस्वस्थ सवयींमुळे आपले पोट आणि कंबरेभोवती चरबी वाढते आणि नंतर शरीराचा एकंदर आकार बिघडतो. (Belly Fat Burning Tips) याचा आपल्या सौंदर्यावरही परिणाम होतो. आता सकाळ-संध्याकाळ धावणे किंवा जिममध्ये तासनतास घाम गाळणे प्रत्येकाला शक्य नाही. याशिवाय, प्रत्येकजण सेलिब्रिटींप्रमाणे चोवीस तास आहारतज्ज्ञांच्या देखरेखीखाली राहू शकत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सहज वजन कमी करायचे असेल, तर सकाळी उठून काही पेये घरी बनवा आणि प्या.


ग्रीन टी प्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर सकाळी ग्रीन टी घ्या. ग्रीन टी   दूध आणि साखरेच्या चहाचा उत्तम पर्याय मानला जातो, त्यामुळे तुम्हाला फिट ठेवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्या. त्याची चव कडू असेल पण ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी खूप चांगली आहे.


लिंबू पाणी प्या


तुमचे वजन वाढत असेल तर लिंबू पाणी पाणी वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी हा अतिशय स्वस्त पर्याय आहे. यासाठी सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात एक लिंबू पिळून त्यात काळे मीठ मिसळून प्या. असे नियमित केल्याने वजन बर्‍याच प्रमाणात कमी होते.


ओवा पाणी


सकाळी ओव्याचे पाणी प्या. ओवा हा  एक मसाल्यातील महत्वाचा घटक आहे. जो  प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळतो, त्याला कॅरम सीड्स (Celery Water) देखील म्हणतात. ओवा खाल्ल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. एका ग्लास पाण्यात ओवा टाकून रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी गाळून प्या.


बडीशेप पाणी


 बडीशेपचे पाणी वजन कमी करण्यासाठी चांगले. बडीशेप ( Fennel Seed Water) अनेकदा जेवणानंतर खाल्ली जाते, कारण ती नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते. एक ग्लासभर पाण्यात एक चमचा बडीशेप मिसळा आणि रात्रभर भिजवा. सकाळी सुती कपड्याने गाळून ते पाणी प्या. तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)