Weight Loss: चुकीच्या जीवनशैलीमुळे वजनात झपाट्याने ( Weight Gain ) वाढ होते. ऑफिसमधील बैठ काम असल्याने लोक सतत एकाच जागी बसून असतात. यामुळे वजन वाढते सोबतच पोटाची चरबी वाढू लागते. वाढत्या वजनामुळे त्रस्त होऊन अनेकजण वजन कमी करण्यासाठी डाएट ( Diet ) किंवा जीम ( Gym ) सुरू करतात. मात्र अनेकदा याचाही काही फायदा होताना दिसत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आज आम्ही तुम्हाला उत्तम उपाय सांगणार आहोत. जर तुम्ही घरी बसून वजन कमी ( Weight Loss ) करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही झोपण्यापूर्वी या सोप्या टिप्स फॉलो करू शकता. यामुळे तुमचं वजन कमी ( Weight Loss ) नक्कीच होईल. 


ज्यावेळी तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा तुम्ही वजन बऱ्याच अंशी नियंत्रित करू शकता. झोपताना अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. अशा स्थितीत तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता. यावेळी जर तुम्ही योग्य गोष्टींचं पालन केलत तर वजन कमी होऊन पोटावरील चरबी देखील कमी होऊ शकते. 


पुरेशी झोप घेणं गरजेचं


जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा वजन नियंत्रणात ( Weight control ) आणायचं असेल तर गाढ झोप घेणं आवश्यक आहे. एका संशोधनानुसार, जर तुम्ही दररोज नीट झोप घेत असाल तर तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 


ज्यावेळी झोप पूर्ण होत नाही तेव्हा...


प्रत्येक व्यक्तीने दर दिवसाला 7-8 तासांची पुरेशी झोप घेणं फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही शरीराला पुरेशी झोप घेता तेव्हा वजन नियंत्रित राहतं. 


आहारात कोणता बदल करावा?


चांगल्या झोपेचा संबंध हा आहाराशी देखील असतो. चांगली आणि गाढ झोप हवी असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही बदल केले पाहिजेत. यामध्ये प्रयत्न करावा की, लाईट पदार्थ खावेत, जे पचण्यासाठी हलके असतील. पचनाला हलके असलेले पदार्थ पचनकार्याला अधिक वेळ घेत नाही. याशिवाय जेवणानंतर लगेच कधीही झोपू नये. जेवल्यानंतर 10 मिनिटं तरी चाललं पाहिजे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)