Habits To Maintain Weight Loss : भारतीय लोकांना विविध पदार्थ खायला खूप आवडतात. त्यामुळे अनेकांना वजन (Weight) वाढण्याची भीती असते. आज योगा, जीम करुन लोक कसं बसं वजन कमी (weight loss) करतात. वजन कमी करणे हे खूप कठीण गोष्ट पण त्याहून कठीण असतं ते म्हणजे कमी केलेलं वजन नियंत्रणात (Weight Maintain) ठेवणे. कारण आपण आयुष्यात अशा काही चुका (weight loss mistakes) करतो त्यामुळे कमी केलेलं वजन पुन्हा वाढू लागतं आणि आपल्याला टेन्शन येतं. पण आता काळजी करु नका तुम्ही आयुष्यात या 5 चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा आणि आताच त्या गोष्टी करणं टाळा. (weight loss mistakes Habits To Maintain Weight Loss belly fat flat tummy)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


1. वजन कमी झालं की अनेक जण वर्कआउट कमी करतो आणि हीच चूक पुन्हा वजन वाढीस कारणीभूत ठरते. जर तुम्ही असं करत असाल तर थांबा नियमित वर्कआउट सुरु ठेवा. 



2. एकदा काय वजन कमी झालं की आपण सुटकेचा श्वास सोडतो आणि पुन्हा डाएट विसरुन अरबट चरबट खायला लागतो. फास्ट फूड खातो त्यामुळे वजन नियंत्रणात राहत नाही. शेवटी परत वजन वाढण्यास सुरुवात होते. 



3. तेलकट आणि मसालेदार पदार्थ आपण वजन कमी करण्यासाठी सोडलं असतं. मग वजन कमी झाल्यावर आपण ते पुन्हा खायला सुरु करतो. वजन कमी करण्यासाठी आपण वेळेत खात असतो पण एकदा काय वजन कमी झालं आपण अनेक वेळा अवेळी खातो आणि हीच चूक वजन पुन्हा वाढण्यास आपल्याला महागात पडते. 


4. तुम्हाला माहिती आहे आरोग्य तज्ज्ञांही सांगतात अपुरी झोप ही वजन वाढण्यास मुख्य कारणं आहे. वजन कमी असो किंवा जास्त माणसांना किमान 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. तर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर तुमचं वजन वाढतं. 



5.पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे, यामुळे शरीर हायड्रेट राहते. जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्याचा चयापचयावर परिणाम होतो आणि वजन कमी होण्यात समस्या येतात.


या गोष्टी लक्षात ठेवा!


उच्च प्रथिने फायबरयुक्त आहार घ्या


रिफाइन्ड कार्ब्सचं प्रमाण मर्यादित ठेवा
 
साखरेच्या सेवनावर नियंत्रण ठेवा


फळे आणि भाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करा


दर दोन तासांनी हलके अन्न घेणे आवश्यक आहे
 
पिण्याचे पाणी कमी करू नका
 
दारू पिण्याची वाईट सवय लवकरात लवकर सोडा


या गोष्टी आजच आयुष्यात अमंलबजावणी करा तुम्ही कमी केलेल्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)