मुंबई : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक ताणतणावही वाढण्याचा धोका जास्त असतो. लोकांचं वजन झपाट्याने वाढतं, यामागचे मुख्य कारण म्हणजे लॉकडाऊनमध्ये सतत तासनतास बसणं. यामुळे पोटावर चरबी वाढण्याचीही समस्या दिसून आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या वजनामुळे अनेकजण वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करण्यावर भर देताना दिसतात. परंतु हे देखील उपयुक्त ठरत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही घरी बसून वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही झोपण्यापूर्वी या सोप्या टिप्स फॉलो करू शकता. त्या वजन कमी करण्यात खूप प्रभावी ठरतील.


वजन कमी करण्यासाठी गाढ झोप आवश्यक आहे


वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर गाढ झोप लागणं गरजेचं आहे, गाढ झोप देखील तेव्हाच येते जेव्हा तुम्ही अशा खोलीत झोपता ज्यामध्ये कोणताही आवाज येत नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो. शिवाय खोलीत प्रकाश नसतो, या सर्व टिप्सचा अवलंब करून वजन नियंत्रित केलं जाऊ शकतं. 


जाणून घ्या झोपेची योग्य वेळ कोणती


वजनही नियंत्रणात राहण्यासाठी रोज किमान 7-8 तास झोप घेणं आवश्यक आहे. ही झोप पूर्ण केल्याने वजनही नियंत्रणात राहतं आणि झोपेची कमतरता भासणार नाही.


चांगल्या झोपेसाठी काय खावं


हलकं अन्न खाण्याचा प्रयत्न करा, जे पचायला जास्त वेळ लागत नाही. हलके अन्न खाल्ल्याने तुमच्या पचनसंस्थेला जास्त काम करावं लागणार नाही, कारण ते पचायला जास्त वेळ लागत नाही. त्याच वेळी, झोपण्यापूर्वी कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करू नका, जसं की चहा, कॉफी.


रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नका


रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपायला गेल्यास आरोग्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, तर त्याचा पचनसंस्थेवरही परिणाम होतो, त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर सुमारे 10 मिनिटं चाला, त्यानंतर झोपा.