मुंबई :  बदतली जिवनशैली, व्यायामाचा अभाव, अंगाची हालचाल न होणे, खाण्यावर नियंत्रण नसणे अशा कारणांमूळे वजन वाढण्याची समस्या डोके वर काढत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षानुवर्षे प्रयत्न करुनही वजनावर नियंत्रण आणणे कठीण होऊन बसते. पण आहारतज्ञांच्या सांगण्यानुसार तुम्ही हा डाएट फॉलो केलात तर फक्त सात दिवसात ५ किलो पर्यंतचे वजन कमी करु शकता. 


दिवस पहिला 


या प्लाननुसार पहिल्या दिवशी हेल्दी आणि हलक्या आहारा व्यतिरिक्त काही खाऊ नये. फळांमध्ये केळे वर्ज्य करावे. बाकी सर्व फळे तुम्ही खाऊ शकता. खूप पाणी प्यायला हवे.


दिवस दुसरा


दुसऱ्या दिवशी फक्त आणि फक्त भाज्याच खायला हव्यात. उकडलेल्या किवा उबाळलेल्या भाज्या तुम्ही खाऊ शकता. 


दिवस तिसरा


या दिवशी फळ आणि भाज्या दोन्हींचे सेवन करा. तुम्ही सकाळी फळे खाऊ शकता नंतर लंचमध्ये भाज्या, सलाड, आणि जेवणात फळे किंवा भाज्या खाऊ शकता. पण  यादिवशीही बटाटे आणि केळे खाणे टाळावे.


दिवस चौथा


यादिवशी तुम्हाला फक्त केळे आणि दुधच सेवन करावे लागेल. तुम्ही मिल्क शेकचाही वापर करु शकता. 


दिवस पाचवा


पाचव्या दिवशी १ कप भात त्यानंतर दिवसभरात ७ टॉमेटॉ खायला हवे. डिनरच्या वेळीही टॉमेटोचे सेवन करायला हवे. आता पाण्याची मात्रा वाढवून १२ ग्लासवरुन १५ ग्लासपर्यंत न्यायला हवी.


दिवस सहावा


सहव्या दिवशी भाजीचे सेवन करत रहायला हवे. लंचमध्ये भात खाऊ शकता.  रात्रीच्या जेवणातही भाज्या असाव्या. लक्षात ठेवा ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवे. 


दिवस सातवा


सातव्या दिवशीही एक कप उकडलेले तांदूळ खाऊ शकता. या दरम्यान तुम्ही आवडती फळे आणि भाज्या खाऊ शकता. दिवसभर फ्रूट ज्यूस पित राहणे गरजेचे आहे.