`या` वयात वजन कमी करण्याच्या खास टीप्स, रहा हेल्दी आणि फीट
वजन कमी करणं हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी फार कठीण काम असतं.
मुंबई : वजन कमी करणं हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी फार कठीण काम असतं. वाढत्या वयानुसार शरीरातील मेटाबॉलिझम रेट म्हणजेच चयापचय क्रियेचा दर कमी होतो परिणामी वजन वाढण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे वाढत्या वयानुसार व्यक्तीच्या शरीरात देखील अनेक बदल होताना दिसतात. महिलांमध्ये मेनोपॉजनंतर शरीरामध्ये हार्मोनल बदल होतात आणि या कारणाने देखील वजनामध्ये वाढ होते. वयाच्या 40 व्या वर्षांनंतर 20 ते 30 वयाच्या तुलनेत वजन कमी करणं काहीसं कठीण होतं. तर जाणून घेऊया 40 वर्षांनंतर वजन कमी करण्याच्या काही टीप्स.
जास्तीत जास्त प्रोटीनचं सेवन
वयाच्या 30 वर्षानंतर मसल्स 3 ते 8 टक्क्यांपर्यंत कमी होतात. मसल्सचं वजन वयाच्या 60 वर्षानंतर जास्त गतीने कमी होत जातं. मुख्य म्हणजे कॅलरीज बर्न करण्यासाठी मसल्सचा मोठा वाटा असतो. यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होते. म्हणूनच तुमच्या आहारात प्रोटीनचा समावेश करावा ज्यामुळे मसल्स बनण्यास मदत होईल. अंड, डाळ तसंच मीट या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीनचा समावेश असतो.
कार्ब्स नाही तर कॅलरीज कमी करा
वजन कमी करण्यासाठी कॅलरीज घटवणं महत्त्वाचं असतं. सध्या वजन कमी करण्यासाठी या ट्रेंडला खूप फॉलो केलं जातं. प्रोटीनप्रमाणे शरीरासाठी कार्ब्स देखील तितकेच महत्त्वाचे असतात. ते एनर्जी आणि फायबरचा मुख्य स्त्रोत आहेत. त्यामुळे वजन घटवायचं असेल तर शरीरातील कॅलरीज कमी करण्यावर भर द्या.
डार्क चॉकलेट खावं
गोड खाणं तुम्हाला पसंत असेल तर दररोज डार्क चॉकलेटचं सेवन करा. डार्क चॉकलेटमध्ये झिंक आणि इतर पौष्टिक तत्त्व असतात जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. त्याचप्रमाणे डार्क चॉकलेटच्या सेवनाने ताण कमी होण्यासही मदत होते.
कोणतंही डाएट फॉलो करू नका
वजन कमी करायचं असेल तर कोणत्याही पद्धतीचं डाएट फॉलो करू नका. एखाद्या डाएटने वजन कमी होईल असं सांगण्यात येतं मात्र त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. उलट पोषक घटकांच्या कमतरतेमुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक बळावते. त्यामुळे कोणतंही डाएट फॉलो करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. रोज पौष्टिक आहार घ्या आणि त्याचसोबत कॅलरी काऊंटवर लक्ष ठेवा.
वेट ट्रेनिंग करा
वेट ट्रेनिंग केल्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होईल. 40 वर्षांहून अधिक असलेल्या व्यक्तींना एक्सरसाईज करणं फार गरजेचं असतं. वर्कआऊट सेशनमध्ये वेट ट्रेनिंग केल्याने मसल्स बनण्यास मदत होते आणि कॅलरीज देखील जलद गतीने बर्न होतात. यामुळे तुमही हाडंही मजबूत होतात शिवाय ऑस्टिओयोपोरोसिसचा धोकाही कमी होतो.