Rasgulla Disadvantage: रसगुल्ला हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. सणासुदीला किंवा सोहळ्यांना आपण रसगुल्ला हा हमखास खातो. अनेकदा गुलाबजामपेक्षाही रसगुल्ला खायला आवडतो. परंतु तुम्हाला माहितीये का की रसगुल्ला खाण्याचे वाईट परिणामही आपल्यावर होऊ शकतात. त्यातून जर का आपण जास्त प्रमाणात रसगुल्ला खात असू तर आपल्या शरीरावर त्याचा उलटा परिणामही होऊ शकतो. प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीराला चांगला अथवा वाईट दोघांचा परिणाम होतो. आपण असं म्हणतो की अति गोड खाल्ल्यानं साखर वाढते. त्यामुळे आपल्याला अशावेळी कमी गोड खा असंही सांगितले जाते. परंतु या लेखातून आपण जाणून घेऊया की नक्की आपण अशावेळी रसगुल्ला खाताना काय काळजी घ्यावी. रसगुल्ला तुम्ही नक्कीच कितीही खाऊ शकता. परंतु लक्षात घ्या की काही वेगळ्या प्रकृतीच्या लोकांनी तो अतिप्रमाणात खाताना काळजी घेणे हे बंधनकारक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात वर म्हटल्याप्रमाणे गोड पदार्थांनी शुगर वाढते. ते अगदी खरं आहे. जास्त शुगरचा/ मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी कमी प्रमाणात रसगुल्ला खाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशावेळी या प्रकृतीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. रसगुल्ल्यात बरीच साखर असते. 


काय आहेत तोटे? 


1. तुम्ही जर का रसगुल्ला अधिक प्रमाणात खाल्लात तर तुम्हाला वाढत्या वजनाचा सामना करावा लागू शकतो. 
2. तुम्ही जास्ता प्रमाणात एका वेळेस रसगुल्ला खाल्लात तर तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात शुगर वाढल्याचा त्रास होऊ शकतो. 
3. सध्या कॉलेस्ट्रॉल वाढीचा त्रास हा सगळ्यांनाच होतो आहे. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्यात याचा त्रास कमी असावा यासाठी योग्य तो आहार घेणे आवश्यक आहे तेव्हा रसगुल्ल्यामुळेही कोलेस्ट्रॉलचा त्रास वाढू शकतो. 
4. बल्ड प्रेशरचाही यामुळे धोका वाढू शकतो. त्यामुळे अशावेळी आपल्यालाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. 
5. अपचनाचाही यामुळे त्रास वाढू शकतो. रसगुल्ला खाल्ल्लानंतर शक्यतो जास्त प्रमाणात पाणी पिऊ नका. 


रसगुल्ला आपण जास्त करून बाहेरून विकत आणतो तेव्हा तिथल्या साहित्यांचा आपल्याला शरीराला किती फायदा होईल हे आपल्याला माहिती नसते. तेव्हा त्यातील पाकाचाही अनेकांना नुकसान होऊ शकते. तेव्हा अशावेळी आपण कमी खाणं प्रिफर करावं. त्यातून आपण स्विटडीश ही नेहमी जेवणाच्या शेवटी खातो. तेव्हा अशावेळी आपल्याला योग्य त्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो रात्री जेवताना काळजी घ्यावी. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)