Hair Loss Problem : आजच्या काळात बदलती जीवनशैली, (lifestyle) उलट-सुलट खाण्याच्या सवयीसह इतर कारणांमुळे लहान वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत. तर केसांमुळे एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य अधिक खुलते. आपण आकर्षक दिसाव असं प्रत्येकालाच वाटत असते, त्यामुळे काहीजण केसांची विशेष काळजी घेत असतात. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स वापरले जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पू, कंडिशनर यांवर बराच खर्च केला जातो. असे बरेच उपाय करूनही कधीकधी अपेक्षित परिणाम दिसत नाही. कारण केसांना मुळापासून मजबुत करणे गरजेचे असते. तर दुसरीकडे शरीरातील काही विटॅमिन्सच्या (Vitamins) कमतरतेमुळे केसगळती होऊ शकते. कोणते आहेत ते विटॅमिन आणि त्यासाठी कोणत्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा याबद्दल जाणून घ्या..


व्हिटॅमिन्स आपल्या शरीरातील एक महत्त्वपुर्ण घटक आहे. केसांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी व्हिटॅमिन्स 'डी' (Vitamins D ) ची आवश्यकता असते. या व्हिटॅमिनचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. याच कारणामुळे याला सनशाइन व्हिटॅमिन्स असे म्हटले जाते. तरी काही खाद्यपदार्थ खाऊन आपण हे व्हिटॅमिन्स मिळू शकतो. आपल्या शरीरात व्हिटॅमिनची 'डी' कमतरता असल्यास कोण कोणत्या नुकसानीला सामोरे जावे लागेल.


१. शरीर होते कमकुवत : व्हिटॅमिन्स 'डी'  (Vitamins D )  ची शरीरात कमतरता असल्यास आपले शरीर कमकुवत होते. ज्यामुळे आपल्याला दिवसभर थकवा जाणवू लागतो. या समस्येपासून वाचण्यासाठी तुम्ही रोज 15 ते 20 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या, किंवा अंडी, दही, संत्री आणि गाईचे दूध प्या. 


२. केसगळती : केस गळणे (hair loss) ही एक सध्याच्या काळातील सामान्य समस्या बनली आहे. या समस्येमुळे काही लोक तरुण वयातच वृध्द दिसू लागतात. व्हिटॅमिन्स 'डी' (Vitamins D )  केसांच्या फोलिकल्स वाढवते. जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन 'डी' पातळी कमी झाली असेल तर आपले केस लवकर गळायला सुरुवात होते. 


वाचा : सोने चांदीच्या दरात आणखी वाढ; जाणून घ्या आजचे नवे दर


३. मानसिक आरोग्यावर परिणाम : बऱ्याच लोकांना हे माहित नाही की, आपल्या शरीरात व्हिटॅमिन 'डी' (Vitamins D ) ची कमतरता असल्यास आपल्या मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. शरीरात व्हिटॅमिन्स 'डी' (Vitamins D )  च्या कमतरतेमुळे मूड खराब होणे, तणावात असणे, चिंताग्रस्त वाटणे यांसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. 


४. बरे होण्यास वेळ लागतो : जर शरीरात व्हिटॅमिन्स 'डी' (Vitamins D )  ची कमतरता असेल तर आपल्याला जर एखादी जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही. तसेच जखम भरुन निघण्यास वेळ लागतो. हे असे का होते तर याचे कारण म्हणजे व्हिटॅमिन 'डी' जखमा बरी करण्यात आणि जखम लवकर भरण्यास मदत करते.