नवी दिल्ली : विज्ञान क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 2021 चे शरीरविज्ञान आणि वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हे डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पटापौतियन यांना देण्यात आले आहे. या दोन्ही शास्त्रज्ञांना तापमान आणि स्पर्शाच्या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन शास्त्रज्ञांनी आपलं शरीर उष्णता, थंड, स्पर्श आणि दबावाचे संकेत आपल्या मज्जासंस्थेला कसं प्रसारित करतं याचे तपशीलवार वर्णन केलंय.


डॉ. डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पेटापाउटियन हे दोघेही अमेरिकन आहेत. डॉ ज्युलियस कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, सॅन फ्रान्सिस्को येथे प्राध्यापक आहेत, तर डॉ आर्डेम कॅलिफोर्नियामधील हॉवर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत. 


नोबेल पुरस्काराची घोषणा करताना नोबेल असेंब्लीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की उष्णता, थंड आणि स्पर्श जाणवण्याची आपली क्षमता जगण्यासाठी आणि जगाशी संवाद साधण्यासाठी खूप महत्वाची आहे.



आपलं शरीर उष्णतेविरूद्ध कसं कार्य करतं हे शोधण्यासाठी डॉ ज्युलियसने मिरचीमध्ये आढळणारे कॅप्साइसिन हे रासायनिक संयुग वापरलं. या दरम्यान, डॉ ज्युलियसने नसा मध्ये एक सेन्सर शोधला. संशोधनासाठी, डॉ ज्युलियस आणि त्याच्या टीमने मानवी शरीराच्या पेशींमध्ये अशी जीन्स मिसळली, जी वेदनांवर प्रतिक्रिया देतात आणि कॅप्सॅसीनच्या विरोधात कोणत्या जनुकाचा प्रभाव आहे हे ओळखलं.


त्याचप्रमाणे, डॉ आर्डेम आणि त्यांच्या टीमने एक सेन्सर शोधला जो स्पर्श आणि दबाव दिल्यावर रिएक्ट करतो.