माने खाली असा फुगवटा का येतो? ते फक्त पुरुषांमध्येच आढळते का?
त्याचे वैज्ञानिक नाव तुम्हाला माहित आहे का? याचे महत्त्व काय? तर या बद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
मुंबई : तुम्ही काही लोकांच्या मानेला एक गाठीसारखा दिसणारा भाग पाहिला असेल. काही लोकांचा हा भाग खूप मोठा असतो तर काही लोकांना छोटीच गाठ आलेली असते. तर तुम्हाला काय वाटतं हे असं का येत असावं? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? बरेच लोक याला सामान्य भाषेत कावळा, कंठमणी किंवा कंठ देखील म्हणतात, परंतु त्याचे वैज्ञानिक नाव तुम्हाला माहित आहे का? याचे महत्त्व काय? तर या बद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
याचे नाव काय?
विज्ञानाच्या भाषेत त्याला ऍडम्स ऍपल्स म्हणतात. आपण जेंव्हा काही खातो, पितो किंवा काही बोलतो तेव्हा त्यात हालचाल होते. जी मानेवर सहज दिसून येते. जेव्हा व्यक्ती पौढ होते तेव्हा त्याच्या मानेवरती असा फुगवटा दिसून येतो. तुमच्या गळ्यात हे व्हॉईस बॉक्स (स्वरयंत्र) आहे, ज्यामुळे एखादी व्यक्ती बोलू शकते. ऍडम्स ऍपल्स या व्हॉईस बॉक्सचे कव्हर सारखे संरक्षण करते.
हे फक्त पुरुषांनाच असतं का?
आपण हे बऱ्याचदा पाहिले आहे की, हे फक्त पुरुषांमध्ये दिसतं. मग हे फक्त पुरुषांच्या बाबतीत घडतं का? स्त्रियांमध्ये हे सहसा पाहायला मिळत नाही. पण ते तसे नाही. हे प्रत्येक माणसामध्ये आढळते, परंतु स्त्रियांच्या बाबतीत ते स्पष्टपणे दिसत नाही.
त्याला Addams Apples असे नाव का दिले गेले?
गळ्या खालील या भागाला Addams Apple असे नाव का दिले आहे? हा मोठा प्रश्न आहे. असे म्हटले जाते की, त्याचा संबंध अॅडम आणि इव्हच्या बागेशी आहे. त्याच्या बागेत सफरचंदाची बरीच झाडे होती. असे मानले जाते की, बागेतील सफरचंदाच्या झाडावर एक फळ होते ज्याला खाल्ले जाऊ शकत नव्हते. ऍडमने तेच फळ खाल्ले आणि ते त्याच्या घशात अडकले. या घटनेमुळे त्याचे नाव Addams Apples ठेवण्यात आले.
काही लोकांच्या गळ्यातील तो भाग फार मोठा का असतो?
काही लोकांमध्ये त्याचा आकार सामान्यपेक्षा मोठा असतो, तुम्ही कधी विचार केला आहे का? विज्ञान सांगते, त्याचा आकार सामान्यपेक्षा मोठा असण्याचे कारण म्हणजे टिशू. जेव्हा Addams Apple भोवती अधिक टिशू विकसित होतात तेव्हा ते आकाराने मोठे होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अनुवांशिक कारणांमुळे त्याचा आकार सामान्यपेक्षा मोठा असू शकतो. परंतु असे झाल्यास, शस्त्रक्रियेच्या मदतीने ते लहान केले जाऊ शकते. जर तुम्हाला वाटत असेल की, Addams Apples चा आकार सामान्यपेक्षा मोठा आहे, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.