Kidney Disease : किडनी खराब झाल्यावर शरीरात दिसू लागतात ही 5 लक्षणे, जाणून घ्या माहिती
हे लक्षात घ्या की, तुमच्या शरीराच्या या महत्त्वाच्या भागाची काळजी न घेतल्यास त्रास वाढू शकतो.
मुंबई : किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो, आपल्या शरीराती रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतो. एवढेच नाही तर हे आपल्या लघवी मार्गे विषारी द्रव्य बाहेर टाकण्याचे देखील काम करतं. किडनी इलेक्ट्रोलाइट्सची पातळी नियंत्रित करते. किडनीद्वारेच शरीरात मीठ, पाणी आणि खनिजे संतुलित राहतात. किडनीमध्ये असलेले लाखो फिल्टर रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकतात.
परंतु हे लक्षात घ्या की, तुमच्या शरीराच्या या महत्त्वाच्या भागाची काळजी न घेतल्यास त्रास वाढू शकतो. किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी जीवनशैली आणि आहारातील बदल आवश्यक आहेत.
तेलकट आणि जंक फूडचे सेवन केल्याने तुमची किडनी फॅटी होऊ शकते, अशा प्रकारच्या आहारामुळे किडनीवर सतत अतिरिक्त दबाव पडतो आणि त्यामुळे किडनी निकामी होऊ शकते.
जेव्हा आपली किडनी नीट काम करत नाही, तेव्हा आपल्या शरीरात त्याची लक्षणे दिसू लागतात. परंतु या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा ही समस्या वाढू शकते. चला जाणून घेऊया शरीरातील किडनी नीट काम करत नसल्याची लक्षणे कोणते.
जास्त लघवी होणे : मूत्रपिंडात समस्या असल्यास त्याचा पहिला परिणाम लघवीवरच होतो. सहसा, लघवी दिवसातून 8-10 वेळा येते, परंतु यापेक्षा जास्त लघवी हे मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण असू शकते. कधीकधी लघवीत जळजळ आणि रक्तस्त्राव होण्याची समस्या देखील पाहाला मिळतेय असे असल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.
भूक न लागणे आणि वजन कमी होणे: मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे भूक कमी होते आणि रुग्णाचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. या समस्येमुळे रुग्णाला नेहमी पोट भरलेले जाणवते.
पायांना सूज येणे: किडनी शरीरातील अतिरिक्त सोडियम फिल्टर करण्यास मदत करतात. किडनी निकामी झाल्यामुळे शरीरात सोडियम जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे पायांना सूज येऊ शकते. तसेच याचा परिणाम डोळ्यांवर आणि चेहऱ्यावरही दिसून येतो, पण याचा जास्त परिणाम पायांवर होतो.
कोरडी आणि खाज सुटणारी त्वचा: मूत्रपिंड निकामी झाल्यास त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. ज्यामुळे त्वचा कोरडी होते आणि त्वचेला खाज येण्याची समस्या देखील उद्धभवते.
झोप न लागणे आणि अस्वस्थता : ज्या लोकांना किडनीचा त्रास होतो, त्यांची झोपेची पद्धतही बिघडू लागते. झोपेच्या कमतरतेमुळे अस्वस्थता उद्भवते.