अभिनेत्रींमध्ये लोकप्रिय असलेला केटलबेल वर्कआऊट म्हणजे काय? पहिल्यांदाच करताना `या` चूका टाळा
Rashmika Mandanna Exercise : केटलबेल ही एक इंटेस एक्सरसाइज म्हणून ओळखली जाते. कारण यामध्ये शरीराची भरपूर ताकद आणि स्टॅमिना खर्ची होतो. अशावेळी ही एक्सरसाईज बॉलिवूड कलाकारांमध्ये लोकप्रिय होत आहे.
Rashmika Mandanna Exercise : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना तिच्या फिटनेससाठी अनेक प्रकारचे व्यायाम करते आणि ती सोशल मीडियावर तिच्या फिटनेस रुटीनबद्दल स्टोरी किंवा पोस्ट शेअर करते. रश्मिकाच्या वर्कआउट रूटीनमध्ये रनिंगपासून ते रेझिस्टन्स बँड व्यायामाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रश्मिकाला केटलबेल व्यायाम करायलाही आवडते. रश्मिकाने अलीकडेच तिचा एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती केटलबेल व्यायाम करताना दिसत आहे.
केटलबेल व्यायाम म्हणजे काय?
केटलबेल वर्कआउट करताना, लोखंडी बॉलच्या मदतीने व्यायाम केला जातो. केटलबॉलचा वापर डंबेलप्रमाणे केला जातो. केटलबेल हा महत्त्वाचा व्यायाम मानला जातो कारण हा व्यायाम शरीराची ताकद आणि तग धरण्याची क्षमता वाढवण्यासाठी केला जातो. यामुळे तुमच्या शरीराचा गाभा मजबूत होतो. याशिवाय हा व्यायाम करण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
केटलबेल व्यायामाचे फायदे
हे वजन कमी करण्यास आणि शरीराचे वजन राखण्यास मदत करते.
खांदे, हात आणि आर्म्स यांचा व्यायाम केला जातो.
केटलबेल वर्कआउट केल्याने शरीराची लवचिकता वाढते
कॅलरी बर्न करण्यासाठी केटलबेल व्यायाम देखील खूप प्रभावी आहेत. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी वर्कआउट प्लॅन बनवताना केटलबेल व्यायामाचाही त्यात समावेश करता येईल.
यामुळे पाठीचे आणि कमरेचे स्नायू मजबूत होतात.
केटलबेल करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
फक्त प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली व्यायाम करा.
हा एक उच्च-तीव्रतेचा व्यायाम आहे आणि त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच, जर तुम्ही केटलबेलचा व्यायाम यापूर्वी कधीही केला नसेल किंवा पहिल्यांदाच अशा प्रकारचा व्यायाम करणार असाल, तर हा व्यायाम प्रशिक्षक किंवा तज्ञांच्या देखरेखीखालीच करा.
आहारावरही लक्ष केंद्रित करा
लक्षात ठेवा की चांगल्या परिणामांसाठी व्यायामासोबतच तुम्ही तुमच्या आहाराकडेही लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे केटलबेलसारखे कठीण व्यायाम सुरू करण्यापूर्वी शरीराच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेऊन आहार योजना तयार करा. ही योजना बनवण्यासाठी तुमच्या पोषणतज्ञ आणि फिटनेस ट्रेनरची मदत घ्या.
उच्च फायबरयुक्त पदार्थ खा
उच्च प्रथिने आणि उच्च फायबर आहार उच्च-तीव्रतेच्या वर्कआउटसह खूप महत्वाचे मानले जाते. तुमच्या रोजच्या आहारात संपूर्ण धान्य, हिरव्या भाज्या आणि ताजी फळे यांचा समावेश करा.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)