हर्बल वॉटर म्हणजे नेमकं काय? तुम्ही घरच्या घरीही तयार करू शकता, पहा कसं
आज जाणून घेऊया हर्बल वॉटर म्हणजे काय आणि हे कसं तयार केलं जातं?
मुंबई : उन्हाळ्याचे दिवस आले आहेत आणि बाहेर पडल्यावर उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागतात. अशावेळी तुम्ही गार पाण्याऐवजी हर्बल वॉटर पिण्याकडे अधिक भर देतो. मात्र हे हर्बल वॉटर म्हणजे नेमकं काय असतं? याची तुम्हाला माहिती आहे का? तर आज जाणून घेऊया हर्बल वॉटर म्हणजे काय आणि हे कसं तयार केलं जातं?
हर्बल वॉटर म्हणजे काय?
हर्बल वॉटर बनवणं खूप सोपं असतं. हर्बल वॉटर तयार करण्याच्या सामग्रीमध्ये कॅमोमाइल आणि किवी, लॅव्हेंडर आणि स्ट्रॉबेरी सारख्या फ्लेवर्सचा समावेश करू शकता.
ताज्या औषधी वनस्पती आणि फळांसह, उन्हाळ्याच्या हंगामात तुम्हाला हायड्रेट ठेवण्यासाठी हे पाणी उत्तम आहे. हर्बल वॉटर बनवण्यासाठी टरबूज, बेरी आणि लिंबाच्या फोडी यांसारखी फळं वापरता येतात. या पाण्यातून पोषक तत्त्व मिळण्यास मदत होते. हर्बल वॉटरच्या सेवनाने शरीरात आवश्यक खनिजं आणि जीवनसत्त्वांची कमतरता भासत नाही.
या पाण्यात काही औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये पुदीना आणि तुळस यांचं विशेष महत्त्व आहे. तुमच्या पाण्याच्या बाटलीमध्ये काही पुदिना किंवा तुळशीची पाने टाकल्याने तुमच्या पिण्याच्या पाण्यात थोडीशी चव वाढण्यास मदत होते. शिवाय, त्याची कूलिंग क्षमता देखील वाढवता येते.
हर्बल वॉटरसाठी कोणतं कॉम्बिनेशन करू शकता
डाळिंब
टरबूज
गुलाबाच्या पाकळ्या
किवी
काकडी
बडिशेप
संत्र्याची साल
स्ट्रॉबेरी