मुंबई : सध्या लोक, खास करुन महिला वर्ग हा आपल्या नखांची जास्तच काळजी घेऊ लागला आहे. त्यामुळे ते मेनीक्योर सारख्या गोष्टींकडे वळले आहे. मुली नखांना नेलपेंट लावून आपली नखं आणखी सुंदर करतात. परंतु तुम्हाल नखांबाबत या गोष्टी माहित आहेत का? वृद्धत्व आणि शारीरिक समस्यांमुळे नखांचा रंग, टेक्सचर आणि आरोग्य बदलू लागते. त्याच प्रमाणे तुमच्या नखांवर दिसणारे पांढरे चिन्ह काही गंभीर शारीरिक समस्या असल्याचे सांगतात, ज्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जर तुमच्या नखांवर सुद्धा अशा खुणा असतील तर ती चिंतेची बाब आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला तर मग नखांवरील या चिन्हाचा अर्थ समजून घेऊ.


कर्करोगाचा धोका


सहसा त्वचेचा कर्करोग नेहमी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या भागांवर होतो. जसे की हात, पाय किंवा पाठ, तसेच याची लक्षणे तुमचे तळहात, तळवे किंवा नखांवर देखील दिसून येते.


ऑन्कोलॉजिस्टच्या मते, हे नखांच्या खाली किंवा भोवती गुठळ्या किंवा रंगद्रव्याच्या पट्ट्यांमध्ये याचे परिणाम दिसतात. कोणत्याही व्यक्तीचे लक्ष या गुणांकडे जात नाही, परंतु जर आपण तुमच्या नखांवर काही समान खुणा असतील, तर सावध व्हा आणि आपल्या त्वचेची चाचणी घ्या. कारण हा मेलेनोमा सारखा रोगांचे लक्षण देखील असू शकते.


तज्ज्ञांनी सांगितले आहे की, जर मेलेनोमा योग्य वेळी सापडला आणि त्यावर उपचार केले गेले, तर त्यावर मात करणे सहज शक्य होते. हे कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. विशेषतः वृद्धांना याचा सर्वाधिक धोका असतो.


UV रेडिएशन हे मेलेनोमाचे कारण


कॅन्सर रिसर्च यूके च्या मते, UV रेडिएशन  बहुतेक प्रकरणांमध्ये मेलेनोमाचे कारण असल्याचे आढळले आहे. कृत्रिम प्रकाश स्त्रोत जसे सनबँड, टॅनिंग सेटअप इत्यादी यासाठी जबाबदार असू शकतात. पण भारतामध्ये UV रेडिएशन  लोकांच्या त्वचेच्या संपर्कात येतात. ज्यामुळे त्यांना हा रोग होऊ शकतो.


इंडियन जर्नल ऑफ डर्मेटोलॉजीच्या मते, भारतीयांसाठी हे दुर्मिळ आहे आणि अशी प्रकरणे क्वचितच नोंदवली जातात. परंतु तुम्हाला यासंबंधी काहीही चिन्ह आढळले, तर डॉक्टरांशी लगेच संपर्क साधा.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)