कोलकाता : पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण एका व्यक्तीचा मांस खाणाऱ्या बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन होऊन मृत्यू झाला आहे. ज्या बॅक्टेरियामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या बॅक्टेरियाला नेक्रोटाइजिंग फासिसाइटिस (Necrotizing Fasciitis) म्हटलं जातं. हा बॅक्टेरिया जखमांच्या माध्यमातून शरीरात शिरला ज्यामुळे या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेनमधून उतरत असताना हा व्यक्ती जखमी झाला होता. ज्यानंतर तो एका रुग्णालयात उपचार घेत होता. पण या दरम्यान त्याची प्रकृती बिघडू लागल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ट्रामा सेंटरच्या डॉक्टरांनी सांगितली की, जेव्हा या व्यक्तीला येथे दाखल करण्यात आलं तेव्हा तो खूप गंभीर होता. संपूर्ण शरीरात बॅक्टेरिया पसरला होता. त्या व्यक्तीला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.


डॉक्टरांनी माहिती देताना म्हटलं की, शरीरात नेक्रोटाइजिंग फासिसाइटिस (मांस खाणारा बॅक्टेरिया) पसरला होता. बॅक्टेरियाने शरीराच्या खालचा बराच भाग खालला होता. बॅक्टेरियाचं इन्फेक्शन वाढल्याने मोठ्या प्रमाणात अँटिबायोटिक आणि इतर औषधं सुरु होती. पण तरी देखील त्याचा मृत्यू झाला.


काय आहे मांस खाणारा बॅक्टेरिया?


मांस खाणाऱ्या या बॅक्टेरियाला नेक्रोटाइजिंग फासिसाइटिस (Necrotizing Fasciitis) म्हणतात. याचं संक्रमण त्वचा आणि टिशू (Tissue) ला टारगेट करतं. वेळीच त्याचा उपचार केला नाही तर व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते. 'मांस खाणाऱ्या बॅक्टेरिया ब्लड वेसेल्स (Blood Vessels) वर हल्ला करतात.  हे Tissue सह मांसपेशी आणि रक्त प्रवाहात अडथळा तयार करतात. ज्यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही.


कसा पसरतो बॅक्टेरिया?


हा बेक्टेरिया मनुष्याच्या शरिरात तेव्हा प्रवेश करतो जेव्हा व्यक्तीच्या शरीरावर जखमा असतात. जखमांच्या माध्यमातून ते शरीरात प्रवेश करतात. त्यानंतर रक्तप्रवाह करणाऱ्या कोशिकांना टार्गेट करतात. ज्याच्यामुळे ऑक्सीजन पोहोचत असतो. या बॅक्टेरियाच्या इंफेक्शनमुळे असं वाटतं की, जसं तो आपलं मांस खात आहे. म्हणून याला मांस खाणारे बॅक्टेरिया म्हटले जाते.