What is saree cancer in Marathi : साडी हा पृथ्वीवरील सर्वात जुना पोशाख मानला जातो. तसेच भारतात ही एखाद्या महिलेने साडी नेसली की तिला पूर्णपणे समजले जाते. कालांतराने, पाश्चात्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे आज बहुतेक महिलांनी साडी नेसायचे सोडून दिलं आहे. तरी काही महिला आवडीनुसार किंवा सणासुदीला साडी नेसतात. मात्र याच साडी संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका संशोधनानुसार साडी नेसल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो असं समोर आलं आहे. शिवाय हा कॅन्सर केवळ भारतीय महिलांमध्येच दिसून आला आहे. त्यामुळे याला कॅन्सरला साडी कॅन्सर असे नाव ठेवण्यात आले आहे. कॅन्सरहा फक्त साडीचं नव्हे तर इतर कपड्यामुळे पण होऊ शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे. 


साडीमुळे होतोय कॅन्सर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साडी नेसायचं म्हटलं की परकर आलाच. परकर हा साडी खोचण्यासाठी वापरला जातो. शिवाय अनेक महिला साडी सुटू नये म्हणून साडी बांधण्यासाठी परकर अगदी घट्ट कमरेला बांधतात. परकर घट्ट बांधल्यामुळे कमरेला त्याचे घर्षण होऊ लागते आणि त्वचा सोलून काळी पडते. वारंवार त्वचा सोलली गेली का कॅन्सरसारखा गंभीर आजार उद्भवू शकतो.


NCBI च्या अहवालानुसार, हा एक प्रकारचा त्वचेचा कर्करोग आहे जो कंबरेभोवती होतो. कंबरेभोवती कोणतेही कापडे घट्ट बांधल्याने हा आजार होऊ शकतो. ज्यामुळे खाज येते. हे टाळण्यासाठी साडी कमरेला घट्ट बांधू नका, घरगुती गाऊन किंवा कोणतेही सैल कपडे घाला, पेटीकोट आणि साडी जास्त घट्ट नसावी. तसेच साडीच्या कॅन्सरला कपड्यांपेक्षा जास्त स्वच्छता जबाबदार आहे. ज्या भागात जास्त उष्णता आणि आर्द्रता असते तेथे कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. बिहार आणि झारखंडमधून अजूनही त्याची प्रकरणे नोंदवली जात आहेत. भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या सर्व कर्करोगांपैकी 1%  कर्करोग होतो. वैद्यकीय भाषेत याला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (SCC) म्हणतात.


स्किन फिट कपड्यांमुळेही समस्या 


केवळ ड्रेसच नाही तर इतर स्किन फिट कपड्यांमुळेही समस्या उद्भवू शकतात. खूप घट्ट कपडे घातल्यामुळे केल्याने शरीराच्या विशिष्ट भागात उष्णता आणि आर्द्रता येऊ शकते, ज्यामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. कर्करोगाचा पुरावा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो. भारतातील मुंबई येथील आरएन कूपर रुग्णालयातही या संदर्भात अभ्यास करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये धोतीचाही या संशोधनात समावेश करण्यात आला होता. सारी कॅन्सर हे नाव बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले आहे. 68 वर्षीय महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचे प्रकरण समोर आले असून ही महिला 13 वर्षांपासून साडी नेसत होती.