Benefits of Slap Therapy: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक आरोग्याशीशी संबंंधित आजारांचा सामना करावा लागतो. त्यातून केस, त्वचा यांच्याही आरोश्याची योग्य ती काळजी घ्यावी लागते. महिलांसाठी या सर्व गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यातून ऑफिस आणि रूटिनच्या आयुष्यात आपल्या केसांची आणि त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. सध्या हवामान हे वेगानं बदलतं आहे. त्यातून प्रदूषणाचीही समस्या वाढू लागली आहे. अशाच आता आपल्या आरोग्याची नीट काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे असते. खासकरून आपल्या आरोग्यसंबंधी अनेक थेरपीही असतात. जसे की स्लॅप थेरपी हा एक प्रकार आहे. तुम्ही कदाचित याचे फक्त नावं ऐकले असेल परंतु तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटले परंतु या थेरपीचे कमालीचे फायदे आहेत. याद्वारे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की नक्की याचे फायदे काय आहेत? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला कदाचित माहिती नसेल परंतु जेव्हा आपण रडतो तेव्हाही आपल्याला त्या अश्रुंचा आपल्या त्वेचसाठी चांगला फायदो होताना दिसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दु:ख ही असतातच. त्यातून आपल्याला अनेकदा दु:खाची भावना ही व्यक्त करणे फारच कठीण जाते. त्यामुळे आपल्या डोळ्यातून अश्रु तरळायला सुरूवात होते. ज्याचा खरंतर फायदा आपल्या त्वचेला जास्त होतो. नक्की स्लॅप थेरपी काय असते? ती करताना काय काळजी घ्यावी? व ती नक्की कशी करावी? याबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. स्लॅप आणि टिअर थेरपीचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे आपल्याला अनेक रोगांपासूनही दूर राहता येते? 


हेही वाचा - लिपलॉक सीननंतर आता शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्या 'त्या' जुन्या फोटोची चर्चा


काय आहे स्लॅप थेरपी? 


आपल्या कोणी कानशिलात लागवली तर आपल्याला त्याच्या असह्य वेदना होतात आणि त्यामुळे आपल्याला अनेक आजारही उद्धभवू शकतात. त्यातून अनेकांच्या गालातून रक्तही होऊ शकते. परंतु त्याच्या उलट क्रिया तीच, पण हलक्या हातानं आणि प्रेमानं जेव्हा आपण आपल्या गालाभोवती चापटी मारतो तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर होऊ शकतो. हलकेच चापटी मारल्यानं त्वचेचा पोत सुधारायला मदत होते. याला स्लॅप थेरपी असं म्हणतात.


काय आहेत स्लॅप थेरपीचे फायदे? 


  • ही संकल्पना खरंतर दक्षिण कोरियातील आहे. याद्वारे आपल्या त्वचेची सुंदरत आणखीनच वाढते. यासाठी तुम्ही गालावर तुम्ही 50 हलक्या चापट्या मारू शकतात. महिला खासकरून याचा प्रयोग करतात. 

  • या थेरपीमुळे चेहऱ्यावरील छिद्र कमी होतात. सोबतच रक्त परिसंचरण वाढते आणि त्यामुळे आपली त्वचा ही अधिक सुंदर आणि निरोगी वाटते. 

  • याद्वारे तुम्ही ही थेरपी नियमित केल्यानं 6 महिन्यात तुम्हाला याचा फरक जाणवेल. 

  • यानं तुमच्या चेहऱ्याची गुणवत्ता सुधारू शकते आणि तुम्हीही चांगल्या तरूण दिसाल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)