मुंबई : पाय दुखणे ही हल्लीची सर्वात कॉमन समस्या बनली आहे. ही समस्या दुर करण्यासाठी अनेकजन वेगवेगळ्या उपायांचा वापर करतात पण अनेकदा त्याचा काही परिणाम दिसत नाही. या समस्येवर घरगुती आणि उत्तम पर्याय म्हणून मोहरीच्या तेलाची मसाजाची निवड करु शकता. मोहरीच्या तेलाने पायाची मसाज केली तर नेमका काय फायदा होतो आणि त्याचा काय परिणाम होतो याबद्दल जाणून घेऊया...


मोहरीच्या तेलाने पायाची मसाज करण्याचे फायदे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. तुम्हाला जर झोपेची समस्या असेल तर पायाला मोहरीच्या तेलाने मसाज करायला हवी. केवळ 5 ते 10 मिनिटांची मसाज तम्हाला आराम तर देईलच पण झोपेच्या समस्येवर रामबाण उपाय ठरेल.


2. जर तुम्हाला ताणतणाव असेल तर मोहरीच्या तेलाची मसाज केल्याने तुमचा तणाव कमी होऊ शकतो आणि यामुळे तुम्हाला आराम मिळू शकेल. 


3. मोहरीच्या तेलाने पायाची मसाज केल्याने ब्लड सरकुलेशन चांगलं राहतं. त्याचबरोबर, संपूर्ण शरीरात ब्लड फ्लो देखील उत्तम राहतो.


5. पायाच्या दबलेल्या नसांना आणि ब्लॉकेजला नीट करण्यासाठी मोहरीच्या तेलाची मसाज उपयोगी येते. रात्री झोपण्यापूर्वी पायाला मोहरीच्या तेलाने मसाज करावी.


6. तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर मोहरीच्या तेलाने सांध्यांचा मसाज करावा. मोहरीच्या तेलाने केलेली मसाज तुम्हाला सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता.