सरोगसी म्हणजे काय? शरीरसंबंधांशिवायच मूल होतं? जाणून घ्या भारतातील महत्त्वाचे नियम
What is surrogacy in marathi: `सरोगेसी मदर` आणि `सरोगसी` हे शब्द कोणालाच नवीन राहिले नाहीत. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सरोगसीच्या मदतीने पालक झाले आहे. पण भारतातील सरोगेसीचे नियम तुम्हाला माहीतीयं का? त्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या..
What is surrogacy for pregnancy News in Marathi: आई होणं म्हणजे एक प्रकारे बाईचा दुसराचं जन्म म्हटलं जातं. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला आईपणाचा हा अनुभव अनुभवायचा असतो. कारण आई होणे ही जगातील प्रत्येक स्त्रीयासाठी खूप सुंदर भावना असते. आईपण अनुभवताना प्रत्येक स्त्रीसाठी एक अनोखा आनंद आणि उत्साह असतो. पण हे आईपण येताना येताना अनेक समस्या आणि आव्हानांना सामोरे जावं लागत असतं. त्यातच खराब जीवनशैली आणि आहारामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अनेक महिलांना गर्भधारणेत अडचणी येतात. अशावेळी अनेकजण सरोगसी आई होण्याचा पर्याय निवडतात. मात्र तुम्हाला माहीतीय का सरोगसीचा नेमका अर्थ काय? सरोगसीसाठी का केली जाते? सरोगसीची कारणे कोणती? सरोगसची कोणते नियम आहेत? हे जाणून घ्या...
सरोगसी म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायच झालं तर सरोगसी म्हणजे दुसऱ्या महिलेचे गर्भाशय घेणे आणि तिच्या मदतीने मुलाला जन्म देणे. ज्या विवाहित जोडप्यांना काही कारणांमुळे मूल होऊ शकत नाही ते सरोगसीद्वारे मूलाला जन्म देतात. काही स्त्रिया किंवा पुरुष सक्षम नसल्यामुळे किंवा याआधी अबॉर्शन झाल्यामुळे काही कपल्स मूल जन्माला घालू शकत नाही. मात्र त्यांच्यासमोर सरोगसीचा पर्याय असतो. ज्या महिलेच्या गर्भात हे बाळ वाढते त्या महिलेला 'सरोगेट मदर' म्हटले जाते. 9 महिन्यांनंतर बाळाच्या जन्मानंतर, करारानुसार, तो/ती मूल जैविक पालकांकडे सोपवलं जाते. सरोगेसीचे दोन प्रकार आहेत. पहिली पारंपारिक सरोगसी आणि दुसरी गर्भधारणा सरोगसी. नेमकं काय आहेत हे प्रकार जाणून घेऊया...
1. पारंपारिक सरोगसी: गर्भावस्थेतील सरोगसीचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकाराला अल्ट्रास्ट्रिक्ट सरोगसी असे म्हणतात, जेव्हा जोडपे एखाद्या सरोगेट महिलेला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी देतात आणि सर्व खर्च त्यांच्याकडून केला जातो.
2. गर्भधारणाविषयक सरोगसी: गर्भधारणा सरोगसीमध्ये, सरोगेट आईचा मुलाशी कोणताही अनुवांशिक संबंध नसतो. या सरोगसीमध्ये सरोगेट आईची अंडी वापरली जात नाहीत आणि ती मुलाला जन्म देतात. यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी (आयव्हीएफ प्रणाली) तयार केली जाते आणि शुक्राणू आणि अंडी एकत्र केल्यानंतर ते सरोगेट मातेच्या गर्भाशयात रोपण केले जातात.
भारतात नवीन नियम काय आहेत?
सरोगसी नियमन कायदा 2021 नुसार, व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली आहे. 25 डिसेंबर 2021 ला संसदेने विधेयक मंजूर केले. राष्ट्रपतींनी 25 जानेवारी 2022 रोजी किंवा कायदेशीर मान्यता दिली. या कायद्यानुसार व्यावसायिक सरोगसीवर बंदी होती, मात्र परोपकारी सरोगसीला परवानगी दिली होती. ‘परोपकारी सरोगसी’ म्हणजे ज्यामध्ये सरोगेट आई कोणतेही पैसे घेत नाही, फक्त मुलाचा वैद्यकीय खर्च आणि जीवन विम्याचा खर्च कव्हर केला जातो. नातेवाईकांमध्ये एखादी स्त्री, मैत्रीणी किंवा सरोगेट आई असू शकते.
स्त्री फक्त एकदाच सरोगेट मदर होऊ शकते. यासोबतच 'सरोगेट मदर' विवाहित महिला, उत्तम प्रकृती आणि एका आपत्याची आई असायला हवी. देशात फक्त भारतीय कपल सरोगसीला परवानगी आहे. सरोगेट आईला 36 महिन्यांसाठी विम्याखाली कव्हर केलं जातं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतातील LGBTQIA समुदाय अजूनही सरोगसीसाठी पात्र मानला जात नाही.