Weight Loss साठी सगळे ट्रिक्स करुन हैराण झालात? 30-30-30 चा नवा फॉर्म्युला एका झटक्यात वजन घटवतील
Weight Loss Formula : हल्ली प्रत्येकजण वजन कमी करण्याच्या नादात वेगवेगळे फॉर्म्युले वापरले जातात. पण गेल्या काही काळापासून 30-30-30 हा वेट लॉस फॉर्म्युला ट्रेंडमध्ये आहे. हा वेट लॉस फॉर्म्युला काय आहे? यामध्ये कोणत्या गोष्टी फॉलो केल्या जातात.
लठ्ठपणा हा सगळ्या आजारांच मूळ असल्याचं अधोरेखित झालं आहे. प्रत्येकजण ओव्हरवेटकडे वळत आहे. हेल्थ एक्सपर्टच्या माहितीनुसार, लठ्ठपणा कमी करणे अत्यंत गरजेचे असते. अशावेळी वजन कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे पर्याय फॉलो केले जातात. सामान्यपणे वजन कमी करण्यासाठी घाम गाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सांगण्यात येतं. अशावेळी स्ट्रिक्ट डाएट फॉलो केला जातो. पण गेल्या काही दिवसांपासून 30-30-30 हा नवा फॉर्म्युला फॉलो केला जातोय. पण हा फॉर्म्युला काय आहे, जाणून घ्या.
काय आहे फॉर्म्युला?
30-30-30 च्या नियमाबद्दल, लोकांचा असा विश्वास आहे की, ते वजन कमी करण्यात खूप मदत करू शकते. वजन कमी करण्याच्या 30-30-30 फॉर्म्युल्यासाठी, तुम्हाला सकाळी उठल्यापासून 30 मिनिटांच्या आत 30 ग्रॅम प्रोटीन खावे लागेल आणि नंतर 30 मिनिटे हलका व्यायाम करावा लागेल.
तज्ज्ञांच्या मते, या नियमानुसार, तुम्हाला तुमच्या रोजच्या कॅलरीजच्या 30 टक्के कॅलरीज कमी कराव्या लागतील, म्हणजेच तुम्ही 3 हजार कॅलरीज घेतल्यास, यासाठी तुम्हाला तुमच्या कॅलरीज 2100 पर्यंत कमी कराव्या लागतील. नियमितपणे 30 मिनिटे व्यायाम करण्याव्यतिरिक्त, पोषण संतुलित करणे आणि आपल्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही सकस आहाराचे पालन करावे आणि हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य इत्यादींचे नियमित सेवन करावे.
या गोष्टींची देखील घ्या काळजी
या नियमांसोबत काही गोष्टी फॉलो करणे तितकेच महत्त्वाचे आहे. जंक फूड आणि प्रोसेस्ड फूडपासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासोबच डोकं शांत ठेवणे देखील तितकेच गरजेचे आहे. तसेच मेडिटेशन, योग आणि प्राणायाम केल्यावरही परिणाम होतो. तसेच मेंटल हेल्थ देखील तितकीच महत्त्वाची आहे.
30-30-30 फॉर्म्युलाचे फायदे
या नव्या फॉर्म्युलामुळे चांगल्या सवयी लागण्यास मदत होते.
या नव्या फॉर्म्युलामुळे वजन कमी चांगल्यापद्धतीने होते. तसेच वजन योग्य प्रमाणात कमी झाल्यामुळे शरीरात सकारात्मक बदल होतात.
वजन कमी करताना तो डाएट प्लान फॉलो करणं कठीण होतं. पण 30-30-30 हा फॉर्म्युला अतिशय सोपा आहे.