omicron व्हायरसपासून दूर राहण्यासाठी WHO ने लोकांना काय दिला सल्ला?
कोविड-19 चा नवीन प्रकार पुन्हा एकदा जगभरात चिंतेचे कारण बनला आहे.
मुंबई : कोविड-19 चा नवीन प्रकार पुन्हा एकदा जगभरात चिंतेचे कारण बनला आहे. जेव्हा अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे कमी होऊ लागली, तेव्हा पुन्हा एकदा एक नवीन प्रकार सर्वांच्या मनात भीती निर्माण करू लागला आहे. हा नवीन प्रकार दक्षिण आफ्रिकेत आढळला. असे म्हटले जाते की तो अधिक वेगाने पसरतो आणि त्याचे उत्परिवर्तन देखील 30 पेक्षा जास्त वेळा झाले आहे. या प्रकाराला वैज्ञानिकांनी B.1.1529 असे नाव दिले आहे, तर WHO ने 'Omicron' असे नाव दिले आहे.
ओमिक्रॉन' स्ट्रेनची लक्षणे ( Symptoms of Omicron )
ओमिक्रॉन व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना थकवा, स्नायू दुखणे, घसा खवखवणे आणि कोरडा खोकला यासारखी लक्षणे दिसतात. त्यांच्यापैकी काहींच्या शरीराचे तापमान किंचित वाढले होते.
कोविडच्या नवीन प्रकारापासून सुरक्षित कसे राहायचे?
कोविडचा नवीन प्रकार म्हणजे ओमिक्रॉनची प्रकरणे आतापर्यंत फक्त दक्षिण आफ्रिकेत आढळली असली तरी इतर देशांनीही सावधगिरीचा उपाय म्हणून उपाययोजना सुरु केली आहे. भारतातही सरकार अलर्ट आहे. अशा परिस्थितीत ते टाळण्यासाठी WHO ने काही सल्ला दिला आहे.
- COVID-19 विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी आपण उचलू शकणारे सर्वात प्रभावी पाऊल म्हणजे एकमेकांपासून किमान 1 मीटर अंतर राखणे.
- घराबाहेर पडताना योग्य मास्क घाला.
- खिडक्या उघड्या ठेवा, घर किंवा ऑफिसमध्ये व्हेटिलेशन चांगले ठेवा.
- जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
- हात स्वच्छ धुत राहा.
- शिंकताना किंवा खोकताना रुमाल किंवा टिश्यू वापरा.
- लस अवश्य घ्या.