मुंबई : अनेकदा लोकं सकाळी उठल्याबरोबर अंघोळ करणं पसंत करतात. दरम्यान आपल्याला लहानपणापासून सांगण्यात आलंय की, सकाळी लवकर उठून अंघोळ केली पाहिजे. इतकंच नव्हे तर संध्याकाळी अंघोळ करू नये असंही म्हणतात. अनेक लोकं संध्याकाळी अंघोळ करण्याच्या गोष्टीला चुकीचंही मानतात. मात्र काही लोकांचं मानणं आहे की तुम्ही अंघोळ केली असेल किंवा नाही संध्याकाळी मात्र अंघोळ केलीच पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर मग आज जाणून घेऊया की, संध्याकाळी अंघोळ करण्याचे कोणते फायदे आहेत. त्याचसोबत अंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती आहे आणि अंघोळीच्या बाबतीत कोणतं टाईमटेबल फॉलो केलं पाहिजे जे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. 


...म्हणून संध्याकाळी अंघोळ करणं फायदेशीर


अनेक अहवालांनुसार, बहुतांश लोकं त्यांच्या सोयीप्रमाणे अंघोळ करण्यास प्राधान्य देतात. परंतु संध्याकाळी अंघोळ करणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. जर तुम्ही रात्री अंघोळ करत असाल तर तुम्ही एकदम योग्य निर्णय घेतला आहात. मुख्य म्हणजे रात्रीच्या वेळेस अंघोळ करणं तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. खासकरून पावसाळा आणि गरमीच्या दिवसांमध्ये संध्याकाळी अंघोळ करणं गरजेचं असतं.


सकाळी की संध्याकाळ कधी अंघोळ केली पाहिजे


दीर्घकाळ घराच्या बाहेर राहिल्यामुळे  तुमच्या शरीरावर तसंच त्वचेवर माती, घाम चिटकून राहतो. यामुळे होणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी अंघोळ करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे झोपण्यापूर्वी तुमच्या शरीराला साफ करणं महत्त्वाचं आहे.


संध्याकाळी अंघोळ केल्याने होतील हे फायदे


रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करणं ही एक चांगली सवय आहे. हे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करतं. वास्तविक, रात्री अंघोळ केल्याने उष्णतेमुळे शरीराचं तापमान वाढल्याने रक्तदाब योग्य राहण्यासाठी मदत होते. यासह तुम्ही तणावमुक्त राहू शकता.