मुंबई : आजकाल बरेच लोक थायरॉईड रोग ग्रस्त आहेत. थायरॉईडमध्ये वजन वाढण्यासह हार्मोन देखील असंतुलीत होतात. एका अभ्यासानुसार पुरषांपेक्षा महिलांमध्ये थायरॉइडचे प्रमाण जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांमध्ये ऑटोम्यून्यून समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. आरोग्य तज्ञांच्या माहिती नुसार थायरॉईड संप्रेरक शरीराच्या भागांच्या सामान्य कार्यासाठी आवश्यक असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थायरॉईडमध्ये सामान्यत: दोन प्रकार असतात. 
हायपरथायरॉईडीझ आणि हायपोथायरॉईडीझ थायरॉईड हे दोन पेरकार आहेत.    हायपरथायरॉईडीझममुळे अॅट्रियल फायब्रिलेशन, ऑस्टियोपोरोसिस आणि फ्रॅक्चर होऊ शकते. तर हायपोथायरॉईडीझ कोमा आणि मृत्यूचे मुख्य कारण आहे. थायरॉईड आजाराचे मूळ कारण ऑटोम्यून्यून हे आहे. ही एक आनुवंशिक समस्या आहे. ज्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती एंटीबॉडीज निर्माण करते. हे थायरॉईड ग्रंथींना अधिक संप्रेरक निर्माण करण्यास उत्तेजन देते.    


काय आहेत थायरॉईड आजाराची लक्षणे.


हायपरथायरॉईडीझ थायरॉईडची लक्षणे
- वजन कमी होणे
- गर्मी सहन न होणे. 
- शांत झोप न लागणे. 
- सतत तहान लागणे. 
- हात-पाय थरथरणे.
- ह्यदयाचे ठोके वाढणे. 
- अशक्तपणा जाणवणे.


हायपोथायरॉईडीझ थायरॉईडची लक्षणे
- सुस्तपणा, थकवा जाणवणे.
- ह्यदयाचे ठोके कमी होणे. 
- त्वचा कोरडी पडणे.
- अनियमित मासिक पाळी


थायरॉईडपासुन वाचण्याची उपाय
- रोज ३० ते ४५ मिनिटे व्यायाम केल्यास रक्ताभिसरण वाढून रक्तातील थायरॉइड शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचते.
- मानसिक तणावामुळे थायरॉईडची समस्या उद्भवते, त्यामुळे जास्त तणाव घेऊ नये.
- थायरॉइड विकारांशी संबंधित लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ल्यानेच औषधोपचार सुरू करावा.