Gym मध्ये Workout करताना अनेक सेलिब्रिटींना Heart Attack; कोणतं वय जीमसाठी योग्य, जाणून घ्या
जाणून घ्या जीमला जाण्यासाठीचं योग्य वय
मुंबई : छोट्या पडद्यावरून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Sidhhaant Suryavanshi Passed Away Due To Heart Attack) निधन झालं आहे. जिममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांत अचानक बेशुद्ध पडला. त्याला वाचवण्याचा बराच प्रयत्न केला मात्र त्याची प्राणज्योत मालवली. सिद्धांत बेशुद्ध झाल्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात घेऊन जाण्यात आले मात्र, डॉक्टरांनी जवळपास 45 मिनिट प्रयत्न करूनही त्याचा वाचवण्यात अपयशी झाले. सिद्धांतच्या मृत्युनंतर सोशल मीडियावर कोणत्या वयात Gym Join करायला हवी अशा अनेक गोष्टी सर्च करण्यात येत आहेत.
हेही वाचा : कलाजगताला मोठा धक्का ! या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन
फक्त जीमला जाणे किंवा शरिराच्या कोणत्या एका भागासाठी वर्कआऊट करणं हे चुकीचं आहे. जीमला जाताना विशिष्ठ प्रकारचे कपडे परिधान करणे, योग्य मशिन्स आणि डायट महत्त्वाचं असतं. जीमला जाण्यासाठी योग्य वय काय आहे? असं अनेकांनी सर्च केलं आहे. चला तर जाणून घेऊया जीम जॉइन करण्याच योग्य वय...
जीमला जाण्यासाठी योग्य वय काय आहे?
14 वर्षांपेक्षा कमी वयाचे विद्यार्थी आता जीमला जात आहेत आणि वर्कआउटचे नैसर्गिक प्रकार सोडून देत आहेत ज्याचा आपल्या शरिराला फायदा होतो. चांगली जीम, ट्रेनर किंवा डायट ही कोणतीही गोष्ट अशावेळी कामी येत नाही. तुम्ही वयाच्या 18 वाढदिवसाआधी जीम करू नये.
18 व्या वयातच जीम का जॉइन करावी?
तुमच्या वाढत्या वयानुसार तुमच्या शरिरात अनेक बदल होत राहतात. हार्मोनल बदल आपल्या शरिरात होत असतात. त्याआधी आपलं शरिर एकदम नाजूक असते. जीममध्ये असलेले ट्रेनर्स, मशिन्स किंवा मग डायट या कोणत्याही गोष्टींचा फायदा होत नाही. या वयात Heavy Workout करणं आपल्या शरिरासाठी धोकादायक ठरू शकतं.
वय 18 वर्षांपेक्षा कमी असलेल्या लोकांचा मेंदूचाही विकास होत असतो. याचा अर्थ असाकी जीममध्ये असलेल्या मोठ्या मुलांच्या तुलणेत त्यांची एकाग्रता कमी असते. जर एकाग्रता नसेल तर कोणतीच गोष्ट करता येत नाहीत. त्यामुळे तुम्ही चांगल डायटं आणि जेवणातून विविध गोष्टींचे सेवन करत त्याचा फायदा घ्यायला हवात.
जीमला जाण्या ऐवजी फीट राहण्यासाठी काय करायला हवं?
जेव्हा तुम्ही वाढत्या वयात असता तेव्हा व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. व्यायाम करण्यासाठी तुम्ही धावणं, पोहणं आणि वेगवेगळे खेळ खेळू शकता. फीट राहण्यासाठी हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. याशिवाय तुम्ही घराबाहेर वेळ घालवत आहातना याची खात्री करा. दररोज 45-60 मिनिटे तुम्ही अॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले तर आपल्याला आयुष्यभर फायदा होऊ शकतो.