मुंबई : लग्न होण्यापूर्वी मुलींच्या मनात अनेक प्रश्न असतात. लग्नासाठी उत्सुक असलेल्या मुली काहीशा उदासही असतात. थोडी भीती, काळजी त्यांना वाटत असते. लग्न ही प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. आनंदी काळ. लग्नानंतरचे पहिले वर्ष तर काही खासच असते. पण या वर्षात अनेक प्रश्न पडतात, चिंता वाटते. अनेक विचार येतात. पण लग्नाच्या पहिल्या वर्षात मुलींच्या मनात नेमके काय चालते, या जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

#1. सुरुवातील सगळे छान मस्त वाटते. त्यानंतर एकमेकांसोबत जसजसा वेळ जातो तसतसे एकमेकांच्या सवयी समजू लागतात. त्यानंतर पार्टनरच्या विचित्र सवयी कळल्यावर काय विचार करुन मी याच्याशी लग्न केले होते, असे वाटू लागते.


#2. नोकरी करणाऱ्या मुलींना नेहमी एक प्रश्न पडतो, तो म्हणजे पैसे शेअर करु की माझ्याजवळच ठेवू. लग्नापूर्वी सर्व पैसे स्वतःवर खर्च करणारी मुलगी लग्नानंतर पैसे पतीसोबत शेअर करते आणि भविष्यासाठी सेव्हिंग करते.


#3. बाथरुम शेअर करताना मुली काहीशा कचरतात. कारण मुलांना बाथरुम घाण करण्याची सवय असते.


#4. पतीचा गंभीर स्वभाव अनेकींना कंटाळवाणा, विरस वाटतो. अशावेळी पुन्हा एकदा लग्नाचा निर्णय योग्य होता ना, असा विचार केला जातो.


#5. भांडण सुरु एका गोष्टीवरुन होते आणि कुठेतरी भलतीकडेच भरकटते. त्यामुळे त्याचाही ताण येतो.


#6. लग्नानंतर परक्या घरात जावून त्यांच्याप्रमाणे वागणे काहीसे जड जाते. परक्या घराशी मिळतेजुळते घेणे थोडे कठीण होते.


#7. माहेरी पूर्ण स्वातंत्र्यात वाढलेल्या मुलींवर सासरी कोणतीही गोष्ट करताना थोडा विचार करावा लागतो. कोणाला कोणत्या गोष्टीचे वाईट वाटेल सांगता येत नाही.


#8. नातेवाईकांकडे जाण्याच्या फॉम्यालिटीला अनेकजणी कंटाळतात.