मुंबई : सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत आघाडीवर आहे. WHO च्या मते, दरवर्षी 1 लाख 25 हजार लोक सर्पदंशाचे बळी ठरतात आणि त्यातील 11 हजार लोकांचा मृत्यू होतो. अशा मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्वरित आणि योग्य प्राथमिक उपचार न मिळणे. भारतात सापांच्या सुमारे 236 प्रजाती आहेत. मात्र, यातील बहुतांश साप विषारी नसतात. साप चावल्यामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले लोक जगभरातील ग्रामीण भागातील आहेत. सर्वच साप धोकादायक असतात असा सर्वसामान्य समज आहे, परंतु अशा सापांच्या चाव्यामुळे फक्त इजा होते, आणि त्याच्या दहशतीमुळे मृत्यू होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात विषारी सापांच्या 13 प्रजाती आहेत, त्यापैकी 4 अत्यंत विषारी आहेत - कोब्रा स्नेक, रसेल वाइपर, स्केल्ड वाइपर आणि क्रेट हे सगळ्यात विषारी सापांच्या जाती आहेत. भारतात बहुतेक मृत्यू हे साप किंवा कोब्रा आणि क्रेट चावल्यामुळे होतात.


अशा अपघातांच्या वेळी काय करावे आणि काय करू नये हे बहुतेक लोकांना माहिती नसतं. ज्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे याबद्दल तुम्हाला जाणून घेणे फार महत्वाचे आहे.


काय करावे?


सर्व प्रथम, आपण शहरात असल्यास, ताबडतोब रुग्णवाहिकेला कॉल करा. दुसरीकडे, घाबरण्याऐवजी, ज्याच्यावरती दंश झाला आहे त्याने शांत रहावे, कारण घाबरल्याने तुमच्या हृदयाची गती वाढते. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह गतिमान होतो आणि विष शरीरात वेगाने पसरते.


जखम स्वच्छ करावी, परंतु ती पाण्याच्या प्रवाहाने धुतली जाऊ नये.


जखम कोरड्या कापसाने झाकलेली असावी. जखमेमुळे अंगावकरती सूज येण्यापूर्वी दंश झालेल्या व्यक्तीचे दागिने आणि घट्ट कपडे काढून टाकावे.


जखमेवर बर्फ लावू नये. जखमेला खरवडून काढू नये किंवा तोंडातून विष काढण्याचा प्रयत्न करू नये.


तसेच डॉक्टर किंवा तज्ञांच्या सूचनेशिवाय दंश झालेल्या व्यक्तीला औषधे देऊ नयेत.


या काळात कॅफिन किंवा अल्कोहोलचे सेवन करू नये, कारण तुमचे शरीर विष शोषून घेते.


elifesciences.org मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, डब्ल्यूएचओ सलग अनेक वर्षांपासून भारतात साप चावल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येवर चिंता व्यक्त करत आहे. WHO च्या मते, 2030 पर्यंत, भारतात सर्पदंशाने मृत्यूची प्रकरणे संपूर्ण जगात सर्वाधिक राहतील. त्याच वेळी, 2001 ते 2014 पर्यंतच्या आकडेवारीचा अभ्यास दर्शवितो की देशात अशा 6 लाख 11 हजार 483 प्रकरणांमध्ये 2 हजार 833 लोकांचा मृत्यू झाला आहे.


सन 2000 ते 2019 या कालावधीत साप चावण्याच्या अशा सर्व नोंदी झालेल्या प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतरही अशा प्रकरणांमध्ये मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचे सिद्ध झाले आहे. अनेक ठिकाणी सर्पदंश रोखण्यासाठी प्राथमिक उपचाराचा तीव्र अभाव असल्याचेही या अभ्यासात दिसून आले.


सर्पदंशावर जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार मोफत केले जातात, लोकांमध्येही त्याबाबत जागरुकता कमी आहे. यामुळे लोक अवैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करतात आणि शेवटी पीडितेचा मृत्यू होतो.


तज्ज्ञांच्या मते, सरकारी आरोग्य सुविधा आणि रुग्णालयांमध्ये सर्पदंशाच्या घटनांच्या गांभीर्याबद्दल लोकांना जागरूक करणे हा पीडितांना वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. अभ्यासात असे म्हटले आहे की, वैद्यकीय पदवीधर विद्यार्थ्यांनी त्यांच्या इंटर्नशिप दरम्यान सर्पदंशाशी संबंधित काही अल्प-मुदतीचा कोर्स करणे आवश्यक आहे जेणेकरून ते पीडितांवर उपचार करू शकतील.