Cholesterol level in man:  आजकाल माणसाची लाईफस्टाईल अतिशय व्यस्त झाली आहे त्यात आपण स्वतःकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो . वेळेवर खात नाही, व्योम करत नाही. आणि जर खाल्लंच तरी हल्ली बाहेरचं खाण्यावर जास्त भर दिला जातोय. या सर्वांचा परिणाम शरीरावर पर्वत जास्त होताना दिसतोय. 
कोलेस्टेरॉल (Cholesterol) हा एक चिकट द्रव आहे जो आपल्या रक्तामध्ये असतो. हे रक्ताच्या प्लाझ्माद्वारे वाहून नेले जाते. आपल्या शरीरात 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. पहिले म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणजेच एचडीएल, त्याला गुड कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) असेही म्हणतात आणि दुसरे बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol), ज्याला शरीरासाठी खराब असणारं कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात. खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ शकते, ज्यामुळे अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो. (cholesterol level should be at what age Know in one click health updates )


पुरुषांमध्ये किती असावी कोलेस्ट्रॉलची पातळी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांच्या शरीरातील एकूण कोलेस्टेरॉलची पातळी 125-200 mg/dl च्या दरम्यान असावी. त्याच वेळी, नॉन-HDL पातळी 130 mg/dl पेक्षा कमी आणि LDL पातळी 100 mg/dl पेक्षा कमी असावी. त्याच वेळी, HDL पातळी 40 mg/dl किंवा अधिक असणे आवश्यक आहे.


20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी


20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांच्या शरीरातील एकूण कोलेस्टेरॉल 125-200 mg/dl च्या दरम्यान असावे. याव्यतिरिक्त, नॉन-HDL पातळी 130 mg/dl पेक्षा कमी आणि LDL पातळी 100 mg/dl पेक्षा कमी असावी. HDL पातळी 50 mg/dl किंवा त्याहून अधिक असावी. कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राखणे खूप महत्वाचे आहे, कारण कोलेस्टेरॉलची पातळी खालावल्यावर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.


बेसन खाऊन कोलेस्ट्रॉल कमी करता येतं


बेसनमध्ये फायबर, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, पोटैशियम, कैल्शियम  भरपूर प्रमाणात असतात. आणि हे सर्व पौष्टिक तत्व हृदयासाठी अतिशय महत्वाची आहेत. इतकंच नाही तर डायबेटिज रुग्णांसाठी तर हे वरदान आहे. (besan benefits in cholestrol and diabetics)


शरीरातील शुगर वितळून शरीराबाहेर काढण्याची ताकद एकट्या बेसनात आहे. इतकंच काय बेसनाच्या सेवनाने शरीरातील घाणेरडं कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी होतं.  (Benefits of gram flour chapati controls high cholesterol)


वाढलेलं कोलेस्ट्रॉल शौचावाटे निघून जाईल


बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक पदार्थांचं सेवन केलं जातं, यातले काही पदार्थ खरंच खूप कमी येतात. इसबगोल तुम्हा सर्वानाच परिचयाचा असेल. इसबगोलच्या (isabgol benefits in cholestrerol) सेवनाने कोलेस्ट्रॉवर खूप फरक पडतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार इसबगोल आपल्या आतड्यांमध्ये एक पातळ आवरण तयार करतो ज्यामुळे कोलेस्ट्रॉल तिथे जमा होत नाही आणि शौचावाटे निघून जाते.