Health Benefits and side Effects of Egg Yolk: अंडी ही आपल्या सगळ्यांना आवडतात. कधी आपण ब्रेकफास्ट म्हणून खातो तर कधी स्नॅक्स (Breakfast Egg) म्हणून. परंतु अनेकांना असा संम्रभ असतो की अंड्याच्या आतील पिवळे बलक चांगले की त्यातील पांढरे बलक चांगले. अनेकांना असा प्रश्न पडतो की पिवळं बलक चांगले असल्याच त्याचे फायदे काय आहेत. या पिवळ्या बलकाचे अनेक फायदे आहेत त्याचबरोबर या बलकाचे वाईट फायदेही आहेत. म्हणजेच याचे तोटेही आहेत. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की या बलकाचे फायदे आणि तोटे काय आहेत. एक मुख्य गोष्ट यात महत्त्वाची आहे की, पिवळ्या बलकातून कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. (what the benefits and side effects of eating yellow egg yolk for body know in detail)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वप्रथम जाणून घेऊया की अंड्यातील पिवळ बलक खाण्याचे नक्की तोटे काय आहेत? अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. आपल्या आहारात आपल्याला कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी ठेवयाचे असते परंतु आपण यामुळेच ते ठेवू शकत नाही कधी कधी आपल्याला कळतचं नाही की आपल्या शरीरात इतक्या छोट्या पदार्थामुळेही धोका होऊ शकतो. हे एक संतृप्त फॅटी ऍसिड आहे ज्याचा आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलच्या (Chelostrol) पातळीवर जास्त प्रभाव पडतो व त्यामुळेच हृदयविकाराचा धोका वाढतो. 


अनेकांना अंड्याची ऍलर्जीही निर्माण होऊ शकते ज्यात खाज सुटणं, अंगावर पित्ताच्या गाठी येणं आणि सूज येण्याची लक्षणं आहेत. अंडी ही कुजूही शकतात ज्यात साल्मोनेल नावाचा एक जीवाणू निर्माण होतो ज्याने फूड पोईझेंनिंग होते त्यामुळे अंडी नीट शिजवा.


आता जाणून घेऊया की अंड्यातील या पिवळ्या बलकाचे नक्की फायदे काय आहेत? अंड्यातील पिवळ बलकात जीवनसत्त्वे (A, D, E, K, B6, B12), फोलेट, लोह, जस्त आणि सेलेनियम सारख्या पोषक तत्त्वे असतात. त्याचसोबत उच्च दर्जाची प्रथिने आणि इतर निरोगी पोषक तत्वेही असतात. त्याचसोबत या बलकात कोलीन नावाचेही पोषक तत्त्वे असतात. ज्यानं आपल्या मेंदूला फायदा होतो. ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे अँटीऑक्सिडंटही या बलकात असतात ज्यांनी डोळ्यांचेही रक्षण होते. 


सांगण्याचे तात्पर्य असेच आहे की, अंड्यातील बलकाचे जास्त प्रमाणात सेवन केलेत तर त्याचे गंभीर साईड एफेक्ट्स उद्भवू शकतात आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणामही होतो. तेव्हा अंड खाताना त्याचा जास्त आहारात वापर करणं टाळा, आपल्या शरीराला आवश्यक असेल तेवढ्याच प्रमाणात अंड्याचे सेवन करा.