मुंबई : भारतात वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात. ज्यामध्ये काही खूप विषारी असतात तर काही अविषारी असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर कोणाला साप चावला तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे साप चावल्यावर काय केलं पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


साप चावल्यावर काय करावे


- जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर त्या व्यक्तीने घाबरून जाऊ नये. कारण माणूस घाबरतो तेव्हा त्याचे हृदयाचे ठोके वाढतात. यामुळे विष अजून गतीने शरीरात पसरतं. त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.


- ज्या जागी साप चावला तो भाग दोरीने बांधून ठेवा ज्यामुळे विष अजून शरीरात पसरणार नाही.


- यानंतर साप जेथे चावला आहे त्या भागाच्या आजूबाजूला दाबून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. जेथे साप चावतो त्या भागात विषचं प्रमाण अधिक असतं.


- जर माणसाचं शरीर काळे पडायला सुरुवात झाली तर समजा विष शरीरात पसरलं आहे. अशा वेळी लगेचच त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहचवणे आवश्यक असते.