मुंबई : गर्भपात होण्यामागे अनेक असू शकतात. स्त्रीसाठी गर्भपात होणं हे केवळ मानसिक आरोग्यासाठी नव्हे तर तिच्या शारीरिक आरोग्यासाठीदेखील त्रासदायक आहे. गर्भपाताचा स्त्री शरीरावर होणारा दूष्परिणाम टाळण्यासाठी  आहारात काही बदल करणं आवश्यक आहे. लठ्ठ्पणा हे गर्भपात होण्याचं एक प्रमुख कारण असू शकते. त्यामुळे आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे.प्रेग्नेंसीमध्ये 'या' कॉस्मेटिक्सचा वापर सुरक्षित नाही! 


 मिसकॅरेज / गर्भपातानंतर आहारात काय बदल कराल? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्भपात झाल्यानंतर स्त्रियांच्या आहारात आयर्न म्हणजेच लोहयुक्त पदार्थांचा समावेश वाढवा. यामुळे शरीरात कमी झालेल्या रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. 


आयर्नयुक्त पदार्थांमध्ये हिरव्या पालेभाज्या, डाळिंब, अ‍ॅनिमल लिव्हर, बीट, ब्रोकोली अशा भाज्यांचा समावेश वाढवा.  


गर्भपात होण्यामागे शरीरात फॉलिक अ‍ॅसिडची कमतरता हे एक कारण असते. त्यामुळे स्त्री शरीरात फॉलिक अ‍ॅसिडयुक्त पदार्थ खाणं गरजेचं आहे. 


अंड्यातील पिवळा भाग, पाल्क, बीट, केळ, संत्र, कोबी, बदाम अशा पदार्थांचा आहरात समावेश वाढवा. यामुळे शरीराला फॉलिक अ‍ॅसिडचा पुरवठा होतो. गरोदरपणात 'या' पदार्थामुळे वाढतो मधुमेहाचा धोका


गर्भपात झाल्यानंतर काय खाणं टाळाल? 


आहारात अगदी मसालेदार, तिखट पदार्थ टाळा. अ‍ॅन्टीबायोटिक्स गोळ्यांच्या सोबतीने असे पदार्थ खाणं त्रासदायक ठरतात. gastritis चा त्रास वाढतो.  


प्रोसेस्ड फूड टाळा. 


जंकफूडचा आहारात समावेश करणं टाळा.   सिझेरियन प्रसुतीबाबतची 8 धक्कादायक सत्य !