मुंबई : आजकाल औषध आणि वैद्यकीय क्षेत्रातही बनावट कंपन्यांचा सुळसुळाट वाढला आहे. बाजारातून विकत घेतलेली सारीच औषधं सुरक्षित असतीलच याची पाहता क्षणीच अनेक ग्राहकांना ओळख पटवता येत नाही. परिणाम हा प्रकार जीवावर बेतण्याची शक्यता असते. परंतू आता बनावट औषधांचा धोका वेळीच ओळखणं शक्य होणार आहे.  


कसे ओळखाल बनावट औषध? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधविक्री रोखण्यासाठी आता व्हॉट्सअ‍ॅप तुम्हांला मदत करणार आहे. याकरिता भारत सरकार प्रयत्न करत आहे. 'ट्रेस अ‍ॅन्ड ट्रॅक' या उपक्रमाखाली ग्राहकांना बनावट औषधं ओळखता येणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय याबाबत आघाडीच्या 300 औषध विक्रेत्या कंपन्यांसोबत करार करणार आहे. 


कशी  असेल यंत्रणा? 


कंपन्यांच्या औषधांवर एक 16 अंकी युनिक आयडेंटीटी कोड असेल. त्यावर मोबाईल नंबरही दिलेला असेल. ग्राहकांना औषधाची पडताळणी करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर कोड पाठवायचा आहे. या क्रमांकावर औषध कंपनी, निर्मिती कोठे झाली? मालकाचं नाव अशी माहिती दिली जाईल. बनावट कंपन्यांच्या औषधांवर हा कोड नसेल.