मुंबई : गहूचे पदार्थ खाणारा वर्ग हा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आहे. गहूची फक्त चपातीच नाही तर लापशी, ब्रेड, बिस्किट्स, पास्ता आणि नूडल्ससारखे पदार्थ तयार केले जातात. मात्र याच्या लोकप्रियतेमागे आरोग्यदायी फायदे देखील आहे. यामुळे आपले आरोग्य सुधारण्यास अधिक फायदा होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गव्हाचे आरोग्यदायी फायदे 


गव्हाचे पीठ हे सर्वाधिक फायदेशीर असते. यामुळे गव्हाच्या पोळ्या किंवा गव्हाचे सत्व हे अतिशय फायदेशीर आहे. वजन कंट्रोल करण्यासाठी गव्हाचा खूप फायदा होतो. दररोजच्या आहारात गव्हाचे सेवन केल्यावर नैसर्गिकरित्या वजन कमी होतं. खासकरून महिलांना वजन कमी करण्यासाठी गहू फायदेशीर आहे. 


गव्हात विटामिन बी असतं. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच कार्बोहायड्रेट्स देखील असतात. जे पोट भरण्यासाठी खूप महत्वाचं काम करतात. यामुळे तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही. 



तसेच मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत म्हणजे गहू आहे. मॅग्नेशिअम 300 हून अधिक प्रमाणात असल्यामुळे याचा फायदाच होतो. यामध्ये असलेल्या एंजाइम्सचं मुख्य कार्य हे शरीरात इन्सुलीनचं उत्पादन करणं आणि कार्यक्षमता वाढवणं. 


तसेच बाळाला जन्म दिल्यानंतर मातेने गव्हाचे पदार्थ अधिक खावेत. यामुळे दूध अधिक प्रमाणात निर्माण होते. स्तनपान करण्यास यामुळे सर्वाधिक फायदा होतो.